Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा शेफाली, स्नेह राणाला मागे टाकत इंग्लंडच्या एकलेस्टोनने पटकावला आयसीसीचा पुरस्कार

शेफाली, स्नेह राणाला मागे टाकत इंग्लंडच्या एकलेस्टोनने पटकावला आयसीसीचा पुरस्कार

भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात एकलेस्टोनने आठ विकेट घेतल्या होत्या.

Related Story

- Advertisement -

इंग्लंडची डावखुरी फिरकीपटू सोफी एकलेस्टोनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) जून महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार मिळवताना तिने भारताची सलामीवीर शेफाली वर्मा आणि अष्टपैलू स्नेह राणा यांना मागे टाकले. भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात एकलेस्टोनने आठ विकेट घेतल्या होत्या. तसेच त्यानंतर दोन्ही एकदिवसीय सामन्यांत तिने ३-३ विकेट घेतल्या. टॅमी ब्यूमॉन्टनंतर (फेब्रुवारी) आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवणारी एकलेस्टोन ही इंग्लंडची केवळ दुसरी खेळाडू ठरली.

कामगिरीची दखल घेतल्याचा आनंद

मला हा पुरस्कार जिंकून खूप छान वाटते आहे. आम्ही दरम्यानच्या काळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळलो. त्यामुळे माझ्या कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरीची दखल घेतल्याचा आनंद आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आम्हाला कसोटी सामना जिंकायला आवडले असते, असे एकलेस्टोन म्हणाली. या कसोटी सामन्यातच शेफालीने ९६ आणि ६३ धावांची खेळी केली होती. तर स्नेह राणाने पहिल्या डावात चार विकेट घेताना दुसऱ्या डावात नाबाद ८० धावा केल्या होत्या.

पुरुषांमध्ये कॉन्वे सर्वोत्तम 

- Advertisement -

पुरुषांमध्ये न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज डेवॉन कॉन्वे जून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने हा पुरस्कार मिळवताना न्यूझीलंडच्याच कायेल जेमिसन आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला मागे सोडले. कॉन्वेने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणातच द्विशतक झळकावले. तसेच पुढील कसोटीत अर्धशतक केले. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध त्याने ५४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

- Advertisement -