घरताज्या घडामोडीडॉमिनिकामधील कोर्टानं मेहूल चोक्सीला दिला जामीन, अँटिग्वा जाण्यासही परवानगी

डॉमिनिकामधील कोर्टानं मेहूल चोक्सीला दिला जामीन, अँटिग्वा जाण्यासही परवानगी

Subscribe

डॉमनिकामध्ये अवैध प्रवेश केल्याच्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणीसाठी परत येणे अनिवार्य

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी उद्योजक मेहूल चोक्सी याला डॉमनिक उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मेहूल चोक्सीची प्रकृती बिघडली असल्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला आहे. उपचारासाठी चोक्सीला अँटिग्वामध्ये उपाचर करण्यास जाण्यासाठीही परवानगी दिली आहे. डॉमनिका न्यायालयाने संयुक्त सहिमतीद्वारे हा आदेश दिला आहे. मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी भारताकडील स्पेशल दल प्रयत्न करत आहे परंतु डॉमनिका न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे भारताला धक्का बसला आहे.

मेहूल चोक्सीची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉमनिका कोर्टात सुनावणी करताना चोक्सी रुग्णालयातील बेडवरुनच झूमच्या माध्यमातून हजर राहिला होता. त्याच्यासोबत कायदेशीर पथकाचे नेतृत्व करणारे वकील डग्लस मेंडिस होते. तसेच इतर वकिलांचाही समावेश होता. सुनावणीदरम्यान डॉमनिका न्यायालयाने म्हटलं आहे की, डॉमनिकामध्ये अवैध प्रवेश केल्याच्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणीसाठी परत येणे अनिवार्य आहेत. उपाचारासाठी अँटिग्वा येथे जाण्याची परवानगी देण्यात येत आहे.

- Advertisement -

मेहूल चोक्सी आजारी असल्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या सुनावणीसाठीही न्यायालयात हजर राहू शकला होता. त्यावेळीही चोक्सीने रुग्णालयातू ऑनलाईन माध्यमातून हजेरी लावली होती. सध्या चोक्सी डॉमनिकामधील रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील उपचारासाठी अँटिग्वा येथे जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे परंतु चोक्सी रुग्णालयातच राहू शकतो त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिस कोठडीत घेण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरु

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १३,५०० हजार कोटींच्या घोटाळ्यातील चोक्सी हा मुख्य आरोपी आहे. यातील आणखी एक प्रमुख आरोपी म्हणजे नीरव मोदी. नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी घोटाळा करुन विदेशात पलायन केले. मात्र या दोघांना आता भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -