घरक्रीडाShoaib akhtar : शोएब अख्तरला PTV कडून १०० दशलक्ष रूपयांची मानहानीची नोटीस

Shoaib akhtar : शोएब अख्तरला PTV कडून १०० दशलक्ष रूपयांची मानहानीची नोटीस

Subscribe

पाकिस्तानच्या पीटीव्ही वृत्तवाहिनीने शोएब अख्तरला १०० मिलियन डॉलर म्हणजेच १० करोड रूपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीच्या लाइव कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त कृत्यामुळे तो चर्चेत आला होता. आता या कृत्यामुळे त्याला नव्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानच्या पीटीव्ही वृत्तवाहिनीने त्याला १०० मिलियन डॉलर म्हणजेच १० करोड रूपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. शोएब अख्तर सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानी संघाच्या खेळीबद्दल विश्लेषण करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाला होता. पण त्या कार्यक्रमाचे अँकर नौमान नियाज यांच्या सोबत शोएबचा वाद झाला होता. याच्यानंतर शोएब त्या वृत्तवाहिनीच्या लाइव कार्यक्रमादरम्यान शोमधून बाहेर पडला होता.

- Advertisement -

पाकिस्तानने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकातील आपला दुसरा सामना २६ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरूध्द खेळून सामन्यात विजय मिळवला होता. तेव्हा पाकिस्तानची वृत्तवाहिनी पीटीव्हीचा “गेम ऑन’ कार्यक्रम चालू होता. या कार्यक्रमादरम्यान अँकर नौमान नियाज यांच्यासोबत शोएबचा वाद झाला आणि त्याने लाइव कार्यक्रमातून तो शो सोडून दिला होता. नंतर त्याने त्या वृत्तवाहिनीसोबत त्याचा करार बंद करून या घटनेनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. रावलपिंडी नावाने प्रसिध्द असलेल्या शोएब अख्तरसोबत या कार्यक्रमात आणखी काही आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्लेषक सहभागी झाले होते. यात वेस्टइंडीजचे सर विवियन रिचर्डस, इंग्लंडकडून डेविड गोवर आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार राशिद लतीफ हे सहभागी होते. पण नौमान सोबत वाद झाल्यानंतर शोएब अक्खरने लाइव शोमधून राजीनामा दिला.

तर आता पीटीव्हीच्या क्रिडा विभागाकडून वृत्तवाहिनीचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल शोएबला मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्याने दिलेला राजीनामा वृत्तवाहिनीसोबत केलेल्या करारातील अटींचे उल्लंघन आहे असे पीटीव्हीकडून सांगण्यात आले आहे. माहितीनुसार दोन्ही पक्षातील कोणीही ३ महिन्यांच्या कार्यकाळानंतर काम बंद केल्यानंतर या कराराला स्थगिती देऊ शकतो. पण अख्तरने २६ ऑक्टोबरलाच राजीनामा दिल्याने पीटीव्हीचे आर्थिक नुकसान झाले आहे.

- Advertisement -

नोटीसमध्ये पीटीव्हीने या गोष्टीवर रोष दर्शवला की पीटीव्हीला न सांगताच अख्तर पाकिस्तान सोडून दुबईला गेला आणि त्याने भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगसोबत भारतीय वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. ४६ वर्षीय अख्तरने पीटीव्हीच्या मानहीनीच्या नोटीसवर ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, “हे खूप निंदणीय आहे. जेव्हा मी पीटीव्हीसोबत काम करत होतो तेव्हा ते माझा सम्मान आणि त्याची दखल घेण्यात अयशस्वी झाले. आता ते मला मानहानीची नोटीस पाठवत आहेत. मी एक लढवय्या आहे आणि मी हार मानणार नाही मी कायद्याची लढाई लढणार आहे. माझे वकील सलमान खान नियाजी कायद्याच्या माध्यमातून यावर उत्तर देतील”.


हेही वाचा – AUS VS PAK : तब्बल २० वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा; ‘PCB’ कडून वेळापत्रक जाहीर

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -