घरक्रीडासय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2019

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2019

Subscribe

रविवारी मुश्ताक अली ट्रॉफीच्या ‘ब’ गट लढतीत कर्नाटकने दिल्लीवर आठ विकेटनी मात करत केली. करूण नायर आणि मयांक अगरवाल कर्नाटकच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अगरवालने 47 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकार मारत 43 धावा केल्या तर करूण नायरने आक्रमक खेळी करत अवघ्या 23 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 42 धावा झोडपल्या आणि दिल्लीने दिलेले 109 धावांचे लक्ष्य 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. कर्नाटककडून कौशिकने 4 आणि करिअप्पाने 3 बळी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर दुसर्‍या सामन्यात बंगालने झारखंडचा 8 गडी राखून पराभव केला. झारखंडने प्रथम फलंदाजी करताना 9 गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा केल्या.

झारखंडकडून इशांक जग्गी,विराट सिंग आणि अंकुल रॉय वगळता कोणत्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही.त्यांची संपूर्ण फलंदाजी ढेपाळली. झारखंडचे हे लक्ष्य बंगालने केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.श्रीवस्त गोस्वामीने केलल्या वादळी खेळीच्या जोरावर बंगालने हे लक्ष्य केवळ 13 षटकांत पूर्ण केले.गोस्वामीने केवळ 50 चेंडूंमध्ये नाबाद 86 धावा केल्या.

- Advertisement -

स्कोअरबोर्ड

कर्नाटक वि.दिल्ली

दिल्ली २० षटकांत 9 बाद 109 (नितिश राणा 37 ,ललित यादव 33 , व्ही.कौशिक 4-०-19 -4 , करिअप्पा ४-०-15 -3 , विनय कुमार ४-०-13 -1 ,) पराभूत वि. कर्नाटक 12.5 षटकांत 2 बाद 1१2 (अगरवाल 43 ,करूण नायर 42 , नवदिप सैनी 3 -०-21 -1 )

- Advertisement -

बंगाल वि.झारखंड

झारखंड २० षटकांत 9 बाद 126 (इशांक जग्गी २4, विराट सिंग 27 ,अंकुल रॉय 3७, आकाशदिप 4-०-२4-2, शहबाज अहमद ४-०-21-2 , विक्टीक चॅटर्जी ४-०-12-3 ,) पराभूत वि. बंगाल 13 षटकांत 2 बाद १27 (गोस्वामी 86 , साहा 24 , वरूण अ‍ॅरॉन 3 -०-24 -2 )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -