घरक्रीडाT20 World Cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेला भारत-पाक भिडणार

T20 World Cup: टी-२० विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला भारत-पाक भिडणार

Subscribe

टी-२० विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात होणारी ही स्पर्धा ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये खेळवली जाणार आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. जेतेपदाचा सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.

टी-२० विश्वचषक स्पर्धेचे गट आधीच जाहीर झाले आहेत. पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड्स, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात, तर ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेशला ब गटात स्थान देण्यात आले आहे. प्रत्येक गटातील फक्त अव्वल दोन संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतील. हे सामने १७ ऑक्टोबरपासून सुरु होतील.

- Advertisement -

‘या’ तारखेला भारत-पाक भिडणार

भारतीय संघ गट २ मध्ये असून याच गटात पाकिस्तानचाही समावेश आहे. त्यामुळे चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला सामना होणार आहे.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला २४ ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (२४ ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (३१ ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (३ नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ १ (५ नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ २ (८ नोव्हेंबर)
Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -