Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा T20 world cup 2021 : फक्त पाकिस्तान इग्लंडला रोखू शकते; मायकेल वॉनचा...

T20 world cup 2021 : फक्त पाकिस्तान इग्लंडला रोखू शकते; मायकेल वॉनचा दावा

Subscribe

इग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पाकिस्तानच्या खेळीचे कौतुक करताना पाकिस्तान हा एकमेव संघ या घडीला इग्लंडच्या विजयरथाला रोखू शकतो असा दावा केला आहे

आयसीसी टी २० विश्वचषकात पाकिस्तान आणि इग्लंड हे दोन्ही संघ आपापल्या ग्रुपमध्ये टॉपवर असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच इग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पाकिस्तानच्या खेळीचे कौतुक करताना पाकिस्तान हा एकमेव संघ या घडीला इग्लंडच्या विजयरथाला रोखू शकतो असा दावा केला आहे. इग्लंडचा संघ ग्रुप ए मध्ये पहिल्या तर पाकिस्तानचा संघ ग्रुप बी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दोन्हीही संघानी विश्वचषकात एकही सामना गमावला नाही सलग विजयाची हॅट्रीक लावून दोन्ही संघ गुणतालिकेत टॉपवर आहेत.

पाकिस्तानने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या संघाना पराभूत करून ग्रुप बी च्या टॉपवर जागा मिळवली आहे. तर इग्लंडने वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघाना चितपट करून विश्वचषकात आपले कमालीचे वर्चस्व राखले आहे. इग्लंडचा संघ ६ अंकासह ग्रुप ए च्या तर पाकिस्तानचा संघ ६ अंकासह ग्रुप बी च्या अवव्ल स्थानावर आहे.

- Advertisement -

मायकेल वॉनचा दावा

इग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ट्विट करत दावा केला आहे. “इग्लंडचा संघ सर्वोत्तम आहे. सर्वात आक्रमक म्हणून इग्लंडच्या संघाची ओळख आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या विजयरथाला कोण रोखणार? हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे पण मला वाटते की या घडीला पाकिस्तान हा एकच संघ आहे जो इग्लंडचा पराभव करू शकतो त्यांना रोखू शकतो” अशा शब्दांत मायकेल वॉनने पाकिस्तानचा एकमेव संघ इग्लंडचा पराभव करु शकतो असा दावा केला आहे.

- Advertisement -

इग्लंडचा पुढचा सामना सोमवारी श्रीलंकेसोबत होणार आहे. तर पाकिस्तानचा पुढील सामना नामिबिया विरूध्द बुधवारी होणार आहे. साहजिकच आतापर्यंत पाकिस्तान आणि इग्लंड चालू विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत.

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -