घरक्रीडाT20 world cup 2021: रवीचंद्रन आश्विनने ५ वर्षानंतर टी-२० मध्ये घेतला बळी;...

T20 world cup 2021: रवीचंद्रन आश्विनने ५ वर्षानंतर टी-२० मध्ये घेतला बळी; कोहली म्हणाला….

Subscribe

आश्विनने आपल्या आक्रमक फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर दबाव राखून ठेवला. आश्विनने या सामन्यात तब्बल ५ वर्षानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये बळी घेतला आहे

टी-२० विश्वचषकात बुधावारी भारताचा अफगाणिस्तानसोबत सामना पार पडला. या सामन्यात भारताने विश्वचषकात पहिला विजय मिळवत अफगाणिस्तानचा ६६ धावांनी दारूण पराभव केला. या सामन्यात फिरकीपटू रवीचंद्रन आश्विन जवळपास ४ वर्षानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसला. त्याने आपला हा कमबॅक अतिशय जोरदार आणि अविस्मरणीय आठवणीने केला. अफगाणिस्ताविरूध्दच्या सामन्यात रवीचंद्रन आश्विनने ४ षटकांत फक्त १४ धावा देत २ बळी घेतले. आश्विनने आपल्या आक्रमक फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर दबाव राखून ठेवला. आश्विनने या सामन्यात तब्बल ५ वर्षानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात बळी घेतला आहे.

आश्विनने २०१६ मध्ये वेस्टइंडीज विरूध्दच्या सामन्यात २ बळी घेतले होते त्याच्यानंतर तब्बल ५ वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर आश्विनच्या खात्यात २ बळींची नोंद झाली आहे. २०१६ नंतर २०१७ मध्ये पहिल्यांदा आश्विनने टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने आपला टी-२० तील शेवटचा सामना ९ जुलै २०१७ ला वेस्टइंडीजविरूध्द खेळला होता. तर त्याला शेवटचा बळी २८ ऑगस्ट २०१६ ला वेस्टइंडीज विरूध्दच्या सामन्यात मिळाला होता. त्या सामन्यात त्याने ३ षटकांत ११ धावा देत २ बळी पटकावले होते.

- Advertisement -

बुधवारच्या सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांचा मोठा विजय मिळवला. सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सामन्यात सर्वाधिक काय चांगले वाटले, असे विचारण्यात आले. त्याने सांगितले की, रवीचंद्रन आश्विनचा कमबॅक शानदार वाटला. त्याने व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये चांगली मेहनत केली आहे. आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विराटने अजून सांगितले की, अश्विन बळी घेण्यात सर्वात चतुर गोलंदाज आहे. आयपीएलमधील चांगल्या खेळीमुळे आश्विनची टी-२० सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचा पाकिस्तान, न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात मात्र अश्विनला वगळण्यात आले होते.


हेही वाचा – T20 2021 : Ind vs AFG विजयामुळे भारताचा रनरेट बदलला, सेमी फायनलचे नवे समीकरण काय ?

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -