घरक्रीडातापसी पन्नू साकारणार 'या' अष्टपैलू महिला क्रिकेटपटूची भूमिका

तापसी पन्नू साकारणार ‘या’ अष्टपैलू महिला क्रिकेटपटूची भूमिका

Subscribe

भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट साकारला जाणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मितालीची भूमिका साकारणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, हीच चर्चा खरी ठरली आहे. कारण, तापसीने स्वत: याबाबत खुलासा केला आहे. तापसीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

मिताली राजच्या वाढदिवसानिमित्ताने तापसीने इन्स्टाग्रामवर मितालीसोबतचे फोटो शेअर केले. या फोटोमध्ये मिताली तापसीसोबत केक कापत असल्याचे दिसत आहे. ‘मिताली राज तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझ्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. तुझा संघर्ष पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे. तुझ्या वाढदिवसानिमित्ताने मी तुला काय गिफ्ट द्यावे हे मला समजत नाही. मात्र, मी तुला शब्द देते की तुझा जीवनप्रवास पडद्यावर पाहताना तुला नक्कीच अभिमान वाटेल’, अशा शब्दांत तापसीने इन्स्टाग्रामवर मिताली राजला शुभेच्छा दिल्या. तापसी पन्नूच्या या शुभेच्छाच्या पोस्टनंतर ती मितालीची भूमिका साकारणार आहे, हे निश्चित झाले आहे.

मिताली राजच्या आयुष्यावर आधारीत ‘शाब्बास मिथू’ चित्रपट येणार

गेल्यावर्षी तापसी मिताली राजच्या आयुष्यावर आधारीत चित्रपटात मुख्य भूमिकेचे म्हणजेच मितालीचे पात्र करेल, अशी चर्चा सुरु झाली होती. तापसीला याबाबत एका पत्रकार परिषदेत प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावेळी तापसीने मात्र याबबत निश्चित नसल्याचे म्हटले होते. याशिवाय मिताली राजची भूमिका साकारणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे देखील तिने म्हटले होते. मिताली राजच्या आयुष्यावर आधारीत या चित्रपटीचे नाव शाब्बास ‘मिथू’ असे असणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -