घरक्रीडाथायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

सायना, श्रीकांतची विजयी सलामी

भारताच्या सायना नेहवालला मागील काही काळात दुखापतींमुळे बॅडमिंटन कोर्टच्या बाहेर रहावे लागले आहे. मात्र, सध्या सुरु असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेत तिने चांगले पुनरागमन केले. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सामन्यात सायनाने थायलंडच्या फित्तयापोर्न चायवानचा पराभव करत विजयी सुरुवात केली. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतलाही आपला सामना जिंकण्यात यश आले. समीर आणि सौरभ वर्मा यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

सातव्या सीडेड सायनाने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत चायवानला २१-१७, २१-१९ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. तिला हा सामना जिंकण्यासाठी फार मेहनत करावी लागली नाही. सायनाचा दुसर्‍या फेरीत जपानच्या सयाका ताकाहाशीसोबत सामना होईल. महिलांमध्येच भारताची दुसरी खेळाडू साई उत्तेजिता रावचे आव्हान संपुष्टात आले. तिचा चीनच्या चेन झीनने २१-१७, २१-७ असा सहज पराभव केला.

- Advertisement -

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत किदाम्बी श्रीकांतने चीनच्या रेन पेंग बोवर चुरशीच्या सामन्यात २१-१३, १७-२१, २१-१९ अशी मात केली. प्रणॉयने हाँगकाँगच्या विंग की व्हिन्सेंट वॉन्गचा २१-१६, २२-२० असा पराभव केला. पारुपल्ली कश्यपने तीन गेम रंगलेल्या सामन्यात मिशा झिलबरमनला १८-२१, २१-८, २१-१४ असे पराभूत केले. त्याचा पुढील फेरीत तिसर्‍या सीडेड चोऊ टीन चेनशी सामना होईल. अव्वल सीडेड केंटो मोमोटाने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे शुभांकर डेला थेट दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळाला. या फेरीत त्याच्यासमोर भारताच्याच साई प्रणितचे आव्हान असेल.

सात्विकसाईराज-पोनप्पाची पाचव्या सीडेड जोडीवर मात

थायलंड ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या सात्विकसाईराज राणकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा या जोडीने पाचव्या सीडेड आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चॅन पेंग सून-लिऊ यिंग गोह या जोडीचा २१-१८, १८-२१, २१-१७ असा पराभव करत धक्कादायक विजय मिळवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -