घरक्रीडासुपर सिरीजची संकल्पना नाविन्यपूर्ण!

सुपर सिरीजची संकल्पना नाविन्यपूर्ण!

Subscribe

क्रिकेटच्या ऑस्ट्रेलियाच्या रॉबर्ट्सकडून गांगुलीची स्तुती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वी सुपर सिरीज या चौरंगी क्रिकेट स्पर्धेचा प्रस्ताव मांडला होता. २०२१ मध्ये होणार्‍या या स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आणखी एका देशाचा सहभाग असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) याला अजून मंजुरी दिलेली नाही. मात्र, सुपर सिरीज ही नाविन्यपूर्ण संकल्पना आहे, असे मत क्रिकेटच्या ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यांनी व्यक्त केले.

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने मांडलेली सुपर सिरीज या स्पर्धेची संकल्पना नाविन्यपूर्ण आहे. त्याची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होऊन फारसा वेळ झालेला नाही. मात्र, कमी कालावधीतच त्याने खूप चांगले काम केले आहे. त्याने भारताला कोलकाता येथे डे-नाईट कसोटी सामना खेळण्यास तयार केले. आता त्याने सुपर सिरीज स्पर्धेचा प्रस्ताव मांडला आहे. त्याची ही संकल्पना चांगली आहे, असे रॉबर्ट्स म्हणाले.

- Advertisement -

आयसीसी प्रत्येक वर्षी एक जागतिक स्पर्धा खेळवण्याचा विचार करत आहे. याला पर्याय म्हणून बीसीसीआयने सुपर सिरीज स्पर्धेचा प्रस्ताव मांडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -