घरक्रीडाआयसीसी बॉल टेंपरिंगला अधिकृतरित्या मान्यता देणार?

आयसीसी बॉल टेंपरिंगला अधिकृतरित्या मान्यता देणार?

Subscribe

भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने बॉलवर थुंकीचा वापर न करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला.

क्रिकेटमध्ये गोलंदाज चेंडू चमकण्यासाठी थुंकीचा वापर करत, परंतु कोरोना साथीच्या रोगामुळे गोलंदाजांना आता असं करता येणार नाही. या परिस्थितीत आता चेंडू चमकवण्यासाठी कृत्रिम वस्तूंच्या वापरास परवानगी देण्याचा विचार केला जाऊ शकतो. म्हणजेच बॉल टेंपरिंग आता कायदेशीर केली जाऊ शकते. कोरोनाचा प्रभाव सर्व देशभरात संपल्यानंतर क्रिकेट पुन्हा सुरू होईल तेव्हा आयसीसीला गोलंदाजांच्या चेंडूला थुंकी लावण्याच्या प्रकारावर निर्णय घ्यावा लागेल.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, प्रशासक पंचांच्या देखरेखीखाली कृत्रिम वस्तूचा वापर चेंडू चमकावण्याकरता देण्याचा विचार केला जात आहे. तसं, ते क्रिकेटच्या नियमांनुसार बॉल टेंपरिंग म्हणून ग्राह्य धरलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये चेंडूची चमक खूपच महत्त्वाची असते कारण चेंडूला रिव्हर्स स्विंग किंवा स्विंग करण्यास मदत होते. असं झाल्यास हा एक मोठा बदल होऊ शकतो कारण स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला सँड पेपरने बॉल टेंपरिंग करण्याच्या आरोपाखाली २०१८ मध्ये एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – यावर्षी सचिन वाढदिवस साजरा करणार नाही


आयसीसी ची मुख्य कार्यकारी समितीची बैठक गुरुवारी ऑनलाईन झाली आणि त्यानंतर वैद्यकीय समितीचे प्रमुख पीटर हार्कोर्ड यांनी एक अद्यतन जारी केला. आयसीसीतर्फे असं म्हटलं होतं की आम्ही खेळाडूंची तयारी, सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि त्यांच्या वतीने लादलेल्या निर्बंधासह त्यातील प्रत्येक बाबी विचारात घेऊ. त्याचवेळी भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने बॉलवर थुंकीचा वापर न करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. प्रसाद म्हणाला की, एकदा खेळ पूर्ववत झाल्यावर काही काळ फक्त घामाचा वापर करावा कारण खेळाडूंची सुरक्षितता सर्वांपेक्षा महत्त्वाची आहे आणि त्यांच्या आरोग्याशी खेळू नये.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -