Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ना सावली, ना पावसाचे टेन्शन; जाणून घ्या 'नरेंद्र मोदी स्टेडियम'ची खासियत

ना सावली, ना पावसाचे टेन्शन; जाणून घ्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ची खासियत

जगातील सर्वात मोठ्या 'नरेंद्र मोदी' क्रिकेट स्टेडियमची खास वैशिष्ट्ये जाणून घ्या.

Related Story

- Advertisement -

जगातील सर्वात मोठ्या ‘नरेंद्र मोदी’ क्रिकेट स्टेडियमचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. या स्टेडियची खासियत म्हणजे हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम असून याठिकाणी ना उन्हाचे ना पावसाचे कसलेच टेन्शन नसणार आहे, अशाप्रकारे हे स्टेडियम बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे खेळाडूंसाठी देखील खास सुविधा असणार आहे. ज्या जगात कोणत्याच ठिकाणी दिल्या जात नाहीत.

काय आहे स्टेडियमची खासियत?

या स्टेडियमवर बुधवारी गुलाबी रंगाच्या बॉलने डे-नाईट सामना खेळण्यात आला. गुलाबी बॉलच्या रंगाने खेळताना सायंकाळच्या वेळेस फलंदाजांना त्रास होऊ नये, याकरता तशी व्यवस्था करण्यात आली. तसेच त्याठिकाणी खास तंत्रज्ञानाचा वापर देखील करण्यात आला आहे. याकरता ७ ते ८ महिन्यापासून लाईटमुळे पडणाऱ्या सावलीवर काम करण्यात आले आहे. सूर्यास्त होण्याआधी प्रकाश थोडा वेगळा असतो. त्यामुळे याबाबत ताळमेळ बसवण्यासाठी लाईटला ऑटो प्रोग्राम करण्यात आले आहे. त्यामुळे मैदानावर कशाचीही सावली पडणार नाही. विशेष म्हणजे हीच या स्टेडियमची खासियत असून अशी सुविधा जगातील कोणत्यातच मैदानावर करण्यात आलेली नाही. या स्टेडियममध्ये ११ पिच असून काळ्या आणि लाल मातीचा त्यामध्ये समावेश आहे. हे सेडियम बनवण्यासाठी तब्बल ७०० कोटी लागले आहेत. याठिकाणी खेळाडूंकरता खास ड्रेसिंग रुमचा देखील समावेश केला असून त्यामध्ये चार रुम आहेत. तसेच त्यामध्ये जिमचाही समावेश आहे.

पावसाचेही टेन्शन नाही

- Advertisement -

बऱ्याचदा पाऊस पडायला लागल्यानंतर सामना अचानक थांबवावा लागतो. मात्र, या स्टेडियमवर तशी सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाऊस झाला तरी त्याचा परिणाम सामना खेळण्यावर होणार नाही.


हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध कर्णधार कोहलीच्या नावे झाला अनोखा विक्रम


- Advertisement -

 

- Advertisement -