घरक्रीडागोलंदाजीसोबतच बुमराहच्या क्षेत्ररक्षणातही सुधारणा

गोलंदाजीसोबतच बुमराहच्या क्षेत्ररक्षणातही सुधारणा

Subscribe

प्रशिक्षक श्रीधर यांची स्तुती

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटचा बोलबाला असल्याने गोलंदाजी आणि फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षण आणि फिटनेस या गोष्टींचेही महत्त्व वाढले आहे. मागील तीन वर्षांत बुमराहने गोलंदाजीसोबतच आपल्या क्षेत्ररक्षणातही खूप सुधारणा केली आहे, अशी स्तुती भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी केली.

बुमराह किती अप्रतिम गोलंदाज आहे हे सर्वांनाचा माहीत आहे. तसेच त्याचे क्षेत्ररक्षणही दिवसेंदिवस सुधारत आहे. तो क्षेत्ररक्षणावर सर्वाधिक मेहनत घेणार्‍या खेळाडूंपैकी एक आहे. तो २०१६ मध्ये जेव्हा पहिल्यांदा भारतीय संघात आला होता, तेव्हापासून आजपर्यंत त्याने आपल्या क्षेत्ररक्षणात खूप सुधारणा केली आहे. मात्र, त्याच्या क्षेत्ररक्षणात अजूनही सुधारणा होऊ शकते, असे श्रीधर म्हणाले.

- Advertisement -

भारतीय संघात रविंद्र जाडेजा, विराट कोहली, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या यांच्यासारखे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या खेळाडूंमुळेच भारत जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करणार्‍या संघांपैकी एक आहे, असे श्रीधर यांना वाटते. याबाबत ते म्हणाले, या संघात बरेच चांगले क्षेत्ररक्षक आहेत. स्लिपमध्ये रोहितसारखा खेळाडू असतो, जो फारसे झेल सोडत नाही. त्यानंतर विराट आणि जाडेजासारखे खेळाडू कोणत्याही ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण करतात. हार्दिकही आमच्या संघातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -