घरक्रीडाआज भारत वि.बांग्लादेश टी-20 रणसंग्राम

आज भारत वि.बांग्लादेश टी-20 रणसंग्राम

Subscribe

आजपासून भारत आणि बांग्लादेश संघात 3 सामन्यांची द्विपक्षीय टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीमध्ये आज खेळला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना 7 नोव्हेंबरला राजकोट आणि तिसरा सामना 10 नोव्हेंबरला नागपुरमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध मायदेशात पहिल्यांदाच टी-20 ची द्विपक्षीय मालिका खेळणार आहे. याआधी या दोन्ही संघात द्विपक्षीय टी-20 मालिका झाली नव्हती.

तर बांग्लादेशचा संघ तब्बल 32 महिन्यानंतर भारतात क्रिकेट मालिका खेळण्यासाठी आला आहे. याआधी बांगलादेशने भारतात फेब्रुवारी 2017 मध्ये शेवटचे कसोटी मालिका खेळली होती. या कसोटी मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला होता.

- Advertisement -

भारत आणि बांगलादेश संघात आत्तापर्यंत 8 टी20 सामने खेळण्यात आले आहेत. हे सर्व सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तसेच मायदेशात भारताने बांगलादेश विरुद्ध केवळ 1 टी20 सामना खेळला आहे. हा सामना 23 मार्च 2016 ला टी20 विश्वचषकादरम्यान साखळी फेरीत झाला होता. या सामन्यात भारताने 1 धावेने विजय मिळवला होता. या दोन संघात शेवटचा टी20 सामना 18 मार्च 2018 ला झाला होता. या सामन्यात भारताने 4 विकेटने विजय मिळवला होता.

स्थळ- अरूण जेटली स्टेडियम,नवी दिल्ली

- Advertisement -

वेळ- संध्याकाळी 7 वाजता

थेट प्रक्षेपण-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -