घरक्रीडाTokyo Olympics : ऑलिम्पिकला दोन आठवडे शिल्लक असतानाच टोकियोमध्ये आणीबाणी

Tokyo Olympics : ऑलिम्पिकला दोन आठवडे शिल्लक असतानाच टोकियोमध्ये आणीबाणी

Subscribe

टोकियोत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे. 

यंदा टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या मार्गातील अडथळे संपताना दिसत नाहीत. टोकियोमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून बुधवारी (काल) दोन महिन्यांतील सर्वाधिक रुग्णवाढीची नोंद झाली. आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जपान सरकारने टोकियोत आणीबाणी लागू केली आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या तारखांवर याचा परिणाम होणार नसला ही स्पर्धा प्रेक्षकांविना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यंदा टोकियोत होणारी ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.

आणीबाणीदरम्यानच ऑलिम्पिक 

आम्ही टोकियोमध्ये आणीबाणी लागू करणार आहोत. याचा कालावधी २२ ऑगस्टपर्यंत असेल, असे कोरोना संसर्गाच्या आढावा बैठकीत जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा म्हणाले. या आणीबाणीदरम्यानच टोकियो ऑलिम्पिक पार पडेल. त्यामुळे ही स्पर्धा प्रेक्षकांविनाच होण्याची दाट शक्यता आहे. टोकियोमध्ये बुधवारी ९२० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. १३ मेनंतरची (१०१० नवे रुग्ण) ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली.

- Advertisement -

प्रेक्षकांविना होणार स्पर्धा?

टोकियो ऑलिम्पिकसाठी परदेशी नागरिकांवर मागील महिन्यातच बंदी घालण्यात आली होती. परंतु, ऑलिम्पिकसाठी सर्व ठिकाणी आसनसंख्येच्या ५० टक्के किंवा १० हजार, यापैकी जो आकडा लहान असेल, तितक्या जपानी प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे, असे जपानी आयोजकांनी २१ जूनला सांगितले होते. मात्र, आता टोकियोतील कोरोनाची स्थिती पुन्हा चिंताजनक होत असल्याने ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्येच होण्याची शक्यता आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -