Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : महाराष्ट्राचा प्रविण जाधव तिरंदाजीत खेळणार दीपिका कुमारीसोबत

Tokyo Olympics : महाराष्ट्राचा प्रविण जाधव तिरंदाजीत खेळणार दीपिका कुमारीसोबत

दीपिका आणि प्रविण जाधव ही जोडी शनिवारी तिरंदाजी मिश्र दुहेरीत पदार्पण करताना दिसेल.  

Related Story

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच शनिवारी भारताचे तिरंदाज आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरतील. मात्र, यावेळी अतानू दास आणि दीपिका कुमारी ही पती-पत्नीची जोडी एकत्र खेळताना दिसणार नाही. तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीत दीपिकाच्या साथीने खेळण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रविण जाधवची निवड करण्याचा संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या क्रमवारी फेरीतील कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दीपिका आणि प्रविण जाधव ही जोडी शनिवारी तिरंदाजी मिश्र दुहेरीत पदार्पण करताना दिसेल.

दीपिकाकडून पदकाची अपेक्षा

ऑलिम्पिकमध्ये भारताला आजपर्यंत तिरंदाजीत एकही पदक मिळवता आलेले नाही. यंदा मात्र जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दीपिकाकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. शुक्रवारी झालेल्या क्रमवारी फेरीत दीपिकाला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच मिश्र दुहेरीतही भारत नवव्या क्रमांकावर राहिला. दीपिका आणि अतानू दासने एकत्र खेळताना नुकतेच पॅरिस येथे झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. परंतु, आता तिरंदाजी फेडरेशनने दीपिकाच्या साथीने प्रविण जाधवला खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

क्रमवारी फेरीतील कामगिरीच्या आधारे निवड 

- Advertisement -

आम्ही सध्याच्या कामगिरीच्या आधारे जाधवची निवड केली आहे, असे भारतीय तिरंदाजी संघटनेच्या विरेंद्र सचदेव यांनी सांगितले. आमच्याकडे तरुणदीप रायचाही पर्याय होता. परंतु, क्रमवारी फेरीतील कामगिरीचा विचार करून आम्ही जाधवला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सचदेव म्हणाले. भारताला चिनी तैपेईवर मात करण्यात यश आल्यास उपांत्यपूर्व फेरीत दीपिका कुमारी आणि प्रविण जाधव या जोडीसमोर अव्वल सीडेड कोरियाचे आव्हान असू शकेल. जाधव नवखा खेळाडू आहे, तर दीपिकाच्या गाठीशी खूप अनुभव आहे. हे दोघे मिश्र दुहेरीत चांगली कामगिरी करतील अशी आम्हाला आशा असल्याचेही सचदेव यांनी सांगितले.


हेही वाचा – Pravin Jadhav : साताऱ्याच्या एकलव्याची प्रेरणादायी गगनभरारी!


- Advertisement -

 

 

- Advertisement -