घरक्रीडाTokyo Olympics : देशाला आपल्या कामगिरीचा अभिमान; प्रशिक्षक मरीन यांचा महिला खेळाडूंना...

Tokyo Olympics : देशाला आपल्या कामगिरीचा अभिमान; प्रशिक्षक मरीन यांचा महिला खेळाडूंना संदेश

Subscribe

भारतीय संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.

आपल्याला पदक जिंकता आले नाही. परंतु, आपण मोठे काहीतरी केले आहे. आपल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. देश आपल्याकडून प्रेरणा घेत आहे, असा संदेश भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी खेळाडूंना दिला. भारतीय संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. ग्रेट ब्रिटनने या सामन्यात ४-३ असा निसटता विजय मिळवला. परंतु, भारतीय महिला हॉकी संघाने या सामन्यात आणि स्पर्धेत झुंजार खेळ केला. पहिले तीन सामने गमावल्यानंतर भारताने सलग दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. तसेच कांस्यपदकाच्या सामन्यात दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतरही भारताने पुनरागमन करत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला.

जगाने वेगळा भारतीय हॉकी संघ पाहिला

तुम्ही जिंकण्यासाठी खेळता. आज आम्ही जिंकलो नसलो, तरी प्रशिक्षक म्हणून मला माझ्या खेळाडूंचा अभिमान आहे. मी त्यांनासुद्धा हेच सांगितले. ‘तुम्हाला दुःख झाल्याचे मी समजू शकतो. आपल्याला पदक जिंकता आले नाही. परंतु, आपण मोठे काहीतरी केले आहे. आपल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे. देश आपल्याकडून प्रेरणा घेत आहे. या ऑलिम्पिकमध्ये जगाने वेगळा भारतीय महिला हॉकी संघ पाहिला,’ असे मी माझ्या खेळाडूंना सांगितले. आमचा संघ झुंज देत राहिला, असे मरीन यांनी नमूद केले.

- Advertisement -

प्रशिक्षक म्हणून माझा अखेरचा सामना

जोर्द मरीन यांचा भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून करार संपुष्टात आला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मरीन यांना करार वाढवण्यासाठी विचारणा केली होती, पण वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी नकार दिला. भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून हा माझा अखेरचा सामना होता. त्यामुळे माझ्या कोणत्याही योजना नाहीत. आता जानेका शॉपमनवर या संघाची मदार आहे, असे मरीन ब्रिटनविरुद्धच्या सामन्यानंतर म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -