घरक्रीडाUnder-19 World Cup: 14 षटकार मारणारा दिनेश बाणाचा रोज ९ तास सराव

Under-19 World Cup: 14 षटकार मारणारा दिनेश बाणाचा रोज ९ तास सराव

Subscribe

सुरुवातीला वीनू माकंडच्या पहिल्या २ सामन्यामध्ये हरियाणा संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. पुढील ३ सामन्यात बानाने सलग अर्धशतक करत स्वतःला सिद्ध केले.

दिनेश बाना हे नाव आता देशातील सर्वच क्रिकेटच्या चाहत्यांना माहिती झालं आहे. दिनेश बानाने अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केवळ ४ चेंडूत २० धावा केल्या होत्या. भारताने हा सामना 96 धावांनी जिंकला आहे. दिनेश बाना पुरुष, महिला आणि अंडर-19 अशा कोणत्याही श्रेणीत 4 किंवा त्याहून अधिक चेंडू खेळून केवळ चौकारांवरून धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. बानाच्या यशामागे त्याचे प्रशिक्षक रणवीर जाखडचे मोठं योगदान आहे. रणवीर जाखड यांची सरावादरम्यान बानावर नजर पडली आणि नंतर बानाला ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली त्याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे.

खेळाडू दिनेश बाना वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला आहे की, सुरुवातीला वीनू माकंडच्या पहिल्या 2 सामन्यामध्ये हरियाणा संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. पुढील 3 सामन्यात बानाने सलग अर्धशतक करत स्वतःला सिद्ध केले. बाना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने मागील नोव्हेंबरमध्ये चॅलेंजर ट्रॉफीमधील सामन्यात 98 चेंडूंवर 170 धावा केल्या आहेत. यावेळी त्याने निवड करणाऱ्यांचे चांगलेच लक्ष वेधले होते. इथूनच बानाचा अंडर १९ संघात जाण्याचा रस्ता मोकळा झाला होता. मालिकेत बानाने 10 चौकार आणि 14 षटकार लगावले अशा 124 धावा फक्त चौकार मारुन केले होते.

- Advertisement -

आंतर जिल्हा स्पर्धेत क्रमांक-३ चा खेळाडू

खेळाडू दिनेश बानाचे प्रशिक्षक रणवीर जाखड यांनी सांगितले की, दिनेश बाना आंतर जिल्हा स्पर्धेत क्रमांक ३ चा खेळाडू आहे. परंतु वीनू माकंडमध्ये तो खालच्या क्रमावर खेळतो. जर त्याला आदी खेळण्याची संधी मिळाली तर तो चांगले प्रदर्शन करेल. तो एक चांगला यष्टिरक्षकही आहे. बाना 8 ते 9 तास सराव करतो. जाखड हे स्वत:ही यष्टिरक्षक फलंदाज असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत दिनेश बाना आता आपले स्वप्न पूर्ण करत आहे.


हेही वाचा : IPL 2022 : आयपीएल २०२२ चे सामने कोणत्या शहरात खेळले जाणार?, सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -