घरक्रीडाUS Open 2021 : गतविजेता डॉमिनिक थीम अमेरिकन ओपन स्पर्धेला मुकणार

US Open 2021 : गतविजेता डॉमिनिक थीम अमेरिकन ओपन स्पर्धेला मुकणार

Subscribe

थीमच्या हाताला दुखापत झाली. 

अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतील गतविजेता टेनिसपटू डॉमिनिक थीम यंदाच्या स्पर्धेला मुकणार आहे. २७ वर्षीय थीमच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर पूर्णपणे फिट न झाल्याने थीमने यंदाच्या अमेरिकन ओपन (US OPEN) स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये स्पेनमधील मायोर्का ओपन स्पर्धेत खेळताना थीमच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मागील आठवड्यात त्याला पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यामुळे यंदाच्या अमेरिकन ओपनमधून माघार घेत असल्याची माहिती थीमने ट्विट करत दिली.

- Advertisement -

पुन्हा त्रास जाणवला

मला अमेरिकन ओपन आणि २०२१ वर्षातील उर्वरित स्पर्धांना मुकावे लागणार आहे. न्यूयॉर्कमध्ये मला माझे जेतेपद राखता येणार नसल्याचे दुःख आहे. परंतु, मायोर्का ओपनमध्ये खेळताना हाताला झालेल्या दुखापतीचा अजूनही मला त्रास जाणवत आहे. मागील सहा महिने मी डॉक्टरांच्या सल्ल्यांचे पालन करत आहे. हाताला पट्टी बांधत आहे. तसेच टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्यासाठी फिटनेसवर मेहनत घेत आहे. मी दुखापतीतून सावरत होतो. मात्र, मागील आठवड्यात सरावादरम्यान मी चेंडू मारला आणि त्यावेळी मला खूप त्रास जाणवला. त्यामुळे मी डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी काही चाचण्या केल्या. त्यानंतर माझी दुखापत बरी होण्यासाठी आणखी काही काळ लागेल हे स्पष्ट झाले, असे थीम म्हणाला.

- Advertisement -

हेही वाचा – रॉजर फेडररवर शस्त्रक्रिया; अमेरिकन ओपनला मुकणार


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -