घरक्रीडाविराट जगातील सर्वोत्तम फलंदाज - अॅरॉन फिंच

विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज – अॅरॉन फिंच

Subscribe

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे असे विधान केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना बुधवारी होणार आहे. या मालिकेवर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे. तसेच या दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहली कसा खेळणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. विराट हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे आणि आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचनेही त्याला ही पावती दिली आहे. पण विराट हा सर्वोत्तम फलंदाज असला तरी भारताकडे इतरही चांगले फलंदाज आहेत असे फिंच म्हणाला.

भारताकडे मॅचविनर फलंदाज 

विराट आणि भारतीय फलंदाजांबाबत अॅरॉन फिंच म्हणाला, “सध्या विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो खूप आधीपासूनच सर्वोत्तम फलंदाज आहे. असे असले तरी विराट व्यतिरिक्तही भारताकडे खूप चांगले फलंदाज आहे. जे मॅचविनर आहेत. त्यांच्याकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतके मारणारा फलंदाज आहे. ते आता टी-२० क्रिकेटमध्ये खूप अनुभवी झाले आहेत. विराटसारख्या फलंदाजांवर लक्ष असणे साहजिकच आहे पण त्यांच्याकडे रोहित, शिखर, लोकेश राहुल हे सुद्धा आहेत जे आपल्या दिवशी एकहाती सामना जिंकवू शकतात.”

चांगल्या खेळाचा विश्वास 

ऑस्ट्रेलियन संघ मागील काही काळात चांगले प्रदर्शन करू शकलेले नाहीत. पण असे असले तरी भारताविरुद्ध चांगले प्रदर्शन करण्याचा फिंचला विश्वास आहे. तो म्हणाला, “आम्ही युएईमध्ये झालेली पाकिस्तानविरुद्धची टी-२० मालिका गमावली. तर झिम्बाब्वेमध्ये झालेली तिरंगी मालिकाही आम्हाला जिंकता आली नाही. पण आम्ही त्या मालिकांमध्ये वाईट प्रदर्शन केले नव्हते. आम्ही चांगला खेळ करूनसुद्धा हरलो होतो. त्यामुळे मला या मालिकेत चांगल्या कामगिरीचा विश्वास आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -