घरक्रीडाICC Test Rankings : विराट नंबर दोन! जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर 

ICC Test Rankings : विराट नंबर दोन! जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर 

Subscribe

अव्वल दहा फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचाही समावेश आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या क्रमवारीनुसार, कोहलीला एका स्थानाची एका स्थानाची बढती मिळाली असून ८८६ गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ अव्वल स्थानावर आहे. तसेच अव्वल दहा फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा (सातव्या स्थानी) आणि अजिंक्य रहाणे (दहाव्या स्थानी) यांचाही समावेश आहे. भारतीय संघाने अखेरचा कसोटी सामना मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. मात्र, असे असतानाही भारतीय फलंदाजांनी त्यांचे क्रमवारीतील स्थान कायम राखले आहे. भारतीय संघ आता १७ डिसेंबरपासून पुन्हा एकदा कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराह (७७९ गुण) आणि रविचंद्रन अश्विन (७५६ गुण) अनुक्रमे आठव्या आणि दहाव्या स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (९०४ गुण) अव्वल स्थानी आहे. त्याच्या खालोखाल स्टुअर्ट ब्रॉड आणि निल वॅग्नर यांचा क्रमांक लागतो. तसेच रविंद्र जाडेजा आणि अश्विन या दोन भारतीय खेळाडूंचा अव्वल दहा अष्टपैलू खेळाडूंमध्ये समावेश आहे. बेन स्टोक्स अव्वल स्थानी असलेल्या या यादीत जाडेजा ३९७ गुणांसह तिसऱ्या, तर अश्विन २८१ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. संघांच्या क्रमवारीत, न्यूझीलंडने भारताला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला २-० असा व्हाईटवॉश दिला होता.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -