घरक्रीडाBCCI ने विराटला दिला होता ४८ तासांचा अल्टीमेटम ! आता केएल राहुलकडेही...

BCCI ने विराटला दिला होता ४८ तासांचा अल्टीमेटम ! आता केएल राहुलकडेही मोठी जबाबदारी

Subscribe

बुधवारी टीम इंडियामध्ये मोठी उलथापालथ बघायला मिळाली जेव्हा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने एकदिवसीय सामन्यांसाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली. बीसीसीआयने बुधवारी मोठी घोषणा करत विराट कोहलीच्या जागी एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी ही रोहित शर्माकडे दिली. पण रोहित शर्माला हे कर्णधारपद सोडायचे नव्हते. आगामी २०२३ मध्ये असणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये कोहलीला भारतीय संघाचे नेतृत्व करायचे होते. कोहली कर्णधार पदावरून पायउतार करत नसल्यानेच बीसीसीआयने त्याला ४८ तासांची वेळ दिली होती.

विराटच्या नकारामुळे बीसीसीआयचा निर्णय 

गेल्या साडेचार वर्षांपासून भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीला सन्मानाने पुढचा मार्ग निवडण्याची संधी बीसीसीआयने दिली होती. एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्यासाठी बीसीसीआयने कोहलीला ४८ तासांचा अल्टीमेट दिला होता. पण बीसीसीआयची ऑफर न स्विकारल्यानेच बोर्डाला निर्णय घ्यावा लागला. बोर्डाने घेतलेल्या निर्णयामुळे विराट कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यात येत असल्याचा उल्लेखही आला नाही. फक्त निवड समितीने स्पष्ट केले आगामी वर्षांसाठी बीसीसीआय ही रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी २० सामन्यांसाठीची जबाबदारी देत आहे. त्यामुळेच रोहित शर्मा हा येत्या काळातील कर्णधार असेल असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. या घोषणेनंतरच विराट कोहलीने कर्णधारपद गमावल्याचे जाहीर झाले.

- Advertisement -

आगामी काळात २०२३ चा येऊ घातलेला विश्वचषकच निवडकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे, असे स्पष्ट होत आहे. या सामन्यांमध्ये अधिक चांगला संघ बांधणीसाठी वेळ मिळावा म्हणूनच बीसीसीआयकडून ही निवड केली असल्याचे कळते. ज्या क्षणी भारत टी २० विश्वचषकातून बाहेर पडला, त्याचवेळी विराटला कर्णधार पदावरून हटवण्याचा निर्णय झाला होता. विराट कोहलीला महेंद्रसिंह धोनीकडून कर्णधारपद मिळाले होते. धोनीच्या नेतृत्वावच विराटवर कर्णधारपदाचे संस्कार झाले. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीनेही टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या फॉरमॅटचे कर्णधारपद कोहलीकडे देऊ केले. विराटच्या नेतृत्वात सुरूवातीला कसोटी संघाची जबाबदारी आली. त्यानंतर विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने ९५ पैकी ६५ सामने जिंकले. विराटच्या विजयाची सरासरी ६८ टक्क्यांहूनही अधिक होती.

केएल राहुलला वनडे टीमध्ये मोठी जबाबदारी ?

रोहित शर्माला वनडे टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळतानाच आता बीसीसीआय केएल राहुललाही मोठी जबाबदारी देऊ शकते. याआधीच केएल राहुलला टी २० च्या दोन सामन्यांमध्ये उप कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार केएल राहुलला वनडे सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात येऊ शकते. बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार के एल राहुल हा वनडे टीमचे उपकर्णधार होऊ शकतो. गेल्या काही वर्षात केएल राहुलची चमकदार कामगिरी पाहता त्याला ही जबाबदारी देण्यात येऊ शकते. केएल राहुलकडे येत्या ६ ते ७ वर्षांमध्ये क्रिकेट खेळण्याची संधी आहे. त्यामुळेच येत्या काळात ही जबाबदारी देण्याची घोषणा बीसीसीआयकडून होऊ शकते. येत्या दिवसांमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे. अशातच भारतीय संघाची वन डे सामन्यांची घोषणा होऊ शकते. या दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे सामने खेळणार आहे. केएल राहुलने गेल्या २ वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात केएल राहुलने २ शतकी खेळी केल्या आहेत. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही त्याचा समावेश आहे. केएल राहुलने १२ सामन्यांमध्ये ६२ च्या सरासरीने ६२० धावा केल्या आहेत. त्यामध्ये २ शतकांचा आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने दुसरीकडे ५६० धावा तर रोहित शर्माने २६१ धावा गेल्या हंगामात केल्या आहेत. केएल राहुल आयपीएलच्या गेल्या ४ सिझनमध्येही चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. त्यामध्ये प्रत्येकवेळी ५०० हून अधिक धावा केएल राहुलने केल्या आहेत.

- Advertisement -

New ODI Captain : रोहितकडे टी-२० नंतर एकदिवसीय संघाची कमान; कसोटीतपण घेतली रहाणेची जागा

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -