घरक्रीडाआणि रूनी झाला रक्तबंबाळ

आणि रूनी झाला रक्तबंबाळ

Subscribe

इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू वेन रूनीला मेजर लीग सॉकर लीगमधील डीसी युनायडेड क्लबकडून खेळताना कपाळाला मार लागला आणि तो मैदानावरच रक्तबंबाळ झाला...

इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी खेळाडू वेन रूनीने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. तो इंग्लंडसोबतच मँचेस्टर युनायटेड या इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लबकडून देखील बरीच वर्षे खेळत होता. आता तो ‘मेजर लीग सॉकर’ या लीगमधील डीसी युनायटेड क्लबकडून खेळतो. रविवारी झालेल्या डीसी युनायटेड आणि कोलोरॅडो रॅपिड्स क्लब यांच्यातील सामन्यात रूनीने ३३व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे डीसी युनायटेडने सामन्यात विजय मिळवला. मात्र सामन्याच्या शेवटच्या क्षणात असे काही झाले की ज्यामुळे सर्व रूनी फॅन्सची अक्षरश: पाचावर धारण बसली.

नक्की कसा झाला रूनी जखमी?

सामन्याच्या ९० व्या मिनिटाला कोलोरॅडो रॅपिड्सच्या निकी जॅक्सनने ओन गोल करत डीसी युनायटेडचा विजय निश्चित केला. मात्र ९४ व्या मिनिटाला कोलोरॅडोचा डिफेन्समधील खेळाडू अॅलेक्स सीजॉर्ब आणि रूनी यांच्यात धडक झाली आणि रूनीच्या कपाळातून रक्त वाहू लागले. हळूहळू रक्त चेहऱ्यावर पसरले आणि रूनी रक्तबंबाळ झाला. लगेचच  मैदानावर वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या आणि रूनीला उपचारासाठी नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी रूनीला ५ टाके बसले असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

असा झाला सामना…

सामन्याच्या पहिल्या हाफमध्येच ३३व्या मिनिटाला रूनीने गोल केला आणि सामन्यात डीसी युनायटेडला १-० ची आघाडी मिळवून दिली. यानंतर कोलोरॅडो रॅपिड्स क्लबच्या केलीन अॅकोस्टाने शेवटच्या काही मिनिटात गोल केला. ८२ व्या मिनीटाला केलेल्या या गोलने कोलोरॅडोने सामन्यात बरोबरी साधली खरी मात्र ही बरोबरी जास्त वेळ टिकली नाही आणि सामन्याच्या ९० व्या मिनिटाला कोलोरॅडो रॅपिड्सच्या निकी जॅक्सनने ओन गोल करत डीसी युनायटेडच्या पदरात विजय टाकला.

- Advertisement -
dc united won
डी सी युनायटेड

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -