घरमहाराष्ट्रकोकणात जाणाऱ्यांका खुशखबर!

कोकणात जाणाऱ्यांका खुशखबर!

Subscribe

१३ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्या बुकिंग सुरु झाल्यापासून हाऊसफुल्ल होतात. लोकांची ही मागणी लक्षात घेऊनच या जादा बसेस सोडण्यात येणार असून ९ ऑगस्टपासून ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे.

गणपतीक गावी जायचो प्लॅन केल्यानी… पण तुमका ट्रेनटी तिकिटा गावली नसतील तर काळजी करुचा कारणच नाय… कारण खास गणपतीक कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीने चांगली सोय केली हा. त्यामुळे टेन्शन घेऊचा काय एक कारण नाय. खास गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीकडून तब्बल २ हजार २२५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी कोणतीही काळजी न करता जादा बसेसचा लाभ घ्यावा आणि कोकणात बाप्पाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन परिवहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

९ ऑगस्टपासून तिकीट बुकींग

१३ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. कोकणात जाणाऱ्या गाड्या बुकींग सुरु झाल्यापासून हाऊसफुल्ल होतात. लोकांची ही मागणी लक्षात घेऊनच या जादा बसेस सोडण्यात येणार असून ९ ऑगस्टपासून ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. तर १ ऑगस्टपासून ग्रुप बुकिंगला सुरुवात होणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाची यादी तयार करून ती जवळच्या आगारात देऊन तिकिट बुकिंग करायचे आहे.

- Advertisement -

प्रवाशांसाठी तात्पुरती स्वच्छतागृहे

मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी कर्मचारी काम करणार असून प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये यासाठी कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरूस्ती पथक’ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. शिवाय प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

एसटीकडून आवाहन

कोकणातील सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग व आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख व वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधावा असे आवाहन एसटीतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -