घरक्रीडाPAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा; उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तान दौरा; उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचे यजमानपदासाठी सज्ज झाले आहे. वेस्ट इंडिज संघ जूनमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. यासाठीचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पुन्हा एकदा वेस्ट इंडिजचे यजमानपदासाठी सज्ज झाले आहे. वेस्ट इंडिज संघ जूनमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे. यासाठीचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. गतवर्षी, कोरोना महामारीमुळे, जैव-बबलमध्ये संसर्ग झाल्यानंतर दोन्ही देशांमधील मर्यादित षटकांची मालिका पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा दौरा आयोजित केला जात आहे.

ही एकदिवसीय मालिका २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सुपर लीग सामन्यांतर्गत येते. त्यामुळेच जून महिन्यात या मालिकेचे आयोजन करण्यात येत असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज याच्यातील सामन्यांच्या तारखांची घोषणा करताना स्पष्ट केलं.

- Advertisement -

पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज याच्यातील सामने ८, १० आणि १२ जून रोजी रावळपिंडी येथे खेळवले जाणार आहेत. वेस्ट इंडिजने गेल्या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानचा दौरा केला होता. परंतु, त्यावेळी वेस्ट इंडिजच्या संघातील खेळाडुंना कोरोनाची लागण झाला होता. त्यामुळं एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आली होती. पाहुणा संघ केवळ ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळून तेथून परतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज याच्यात लढत होणार असुन, यामध्ये कोणाचा विजय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळत आहे. यजमान पाकिस्तानने ऑस्ट्रेलियन संघाकडून कसोटी मालिका गमावली आहे आणि आता तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि एक टी-२० सामाना होणार आहे. एकदिवसीय मालिका २९ मार्च रोजी सुरू होईल आणि २ एप्रिल रोजी संपेल, तर एकमात्र टी-20 आंतरराष्ट्रीय सामना ५ एप्रिल रोजी खेळवला जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022: ‘लखनऊ’चा पराभव, मात्र ‘या’ युवा खेळाडूची चांगलीच रंगतेय चर्चा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -