Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा T20 world cup 2021 : धावा होत नाहीत, मग फलंदाजी सोडून परतला...

T20 world cup 2021 : धावा होत नाहीत, मग फलंदाजी सोडून परतला पोलार्ड; चाहत्यांसह, समालोचकही हैरान

Subscribe

जेव्हा वेस्टइंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड बांग्लादेशविरूध्दच्या सामन्यात फलंदाजी करताना अर्ध्यातूनच फलंदाजी सोडून माघारी जातो

आयसीसी टी २० विश्वषकात वेस्टइंडीज विरूध्द बांग्लादेशच्या सामन्यात असे काही घडले की ते पाहून चाहत्यांसोबत समालोचकही हैराण झाले आहेत. जेव्हा वेस्टइंडीजचा कर्णधार कायरन पोलार्ड बांग्लादेशविरूध्दच्या सामन्यात फलंदाजी करताना अर्ध्यातूनच फलंदाजी सोडून माघारी जातो, तेव्हा चाहत्यांसह समालोचकही हैराण झाल्याचे पहायला मिळाले.
त्याने स्वत:ला कोणत्याही कारणाशिवाय नाबाद घोषित केले, आणि तो मैदानात पूर्ण तंदुरूस्त असताना त्याने असे का केले याबाबत चाहत्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सोबतच याप्रकाराबाबत समालोचकही हैरावून गेले आहेत. सर्वांच्या मनात एकच प्रश्न, कोणतेही कारण नसताना कर्णधाराने असे का केले असावे?

हा सगळा प्रकार सामन्याच्या १३ व्या षटकात पहायला मिळाला. कायरन पोलार्डने तस्कीन अहमदच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि नॉन स्ट्राइकिंग एंडवर जाऊन तिथूनच त्याने षटकाच्या अर्ध्यातूनच ड्रेसिंग रूमकडे कूच केली. स्वत: दुखापतग्रस्त असल्याचे घोषित केले. त्याने १६ चेंडूचा सामना केला त्यात त्याला फक्त ८ धावा बनवता आल्या. माहितीनुसार त्याला फलंदाजी करताना धावसंख्या करता येत नव्हती म्हणून त्याने सामन्यातून काढता पाय घेतला. नंतर शेवटच्या षटकात ड्वेन ब्रावो बाद झाल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी परतला, आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारला अशा प्रकारे त्याने २० षटकांअखेर १८ चेंडूत नाबाद १४ धावा केल्या.

- Advertisement -

ट्विटरवर कित्येक चाहत्यांकडून पोलार्डच्या अशा निर्णयाची चर्चा रंगू लागली आहे. या सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार महमुदुल्लाहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, दोन्ही संघाकडून या सामन्यासाठी प्रत्येकी दोन बदल केले आहेत. बांग्लादेशने सौम्य सरकार आणि तस्कीन अहमद तर वेस्टइंडीजने रोस्टॉन चेज आणि जेसन होल्डरला संघात संधी दिली आहे. दोन्हीही संघाला आपल्या पहिल्या २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -