घरक्रीडाIND vs ENG : वनडे संघात निवड झालेला प्रसिद्ध कृष्णा आहे तरी...

IND vs ENG : वनडे संघात निवड झालेला प्रसिद्ध कृष्णा आहे तरी कोण?

Subscribe

२०१८ मध्ये प्रसिद्धला भारत 'अ' संघात संधी मिळाली.

इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची भारतीय संघात निवड झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून या मालिकेला २३ मार्चपासून सुरुवात होईल. स्थानिक क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे प्रसिद्धची भारतीय संघात निवड होईल अशी मागील काही दिवस चर्चा सुरु होती. त्यानुसार आता त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. २५ वर्षीय प्रसिद्ध स्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटकाचे, तर आयपीएल स्पर्धेत तो कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच डावात ५ विकेट घेतल्या. त्याने आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामन्यांत ३४ विकेट घेतल्या आहेत. स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने याहूनही अप्रतिम चांगली कामगिरी केली आहे.

२०१८ पासून केकेआरचे प्रतिनिधित्व

प्रसिद्धने बसवणगुडी क्रिकेट अकादमीमध्ये सर्वप्रथम क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी त्याने कर्नाटक संघामध्ये प्रवेश मिळवला. तसेच आयपीएलमध्ये सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नेट्समध्ये त्याने गोलंदाजी केली, तर २०१८ मध्ये त्याला केकेआर संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत २४ सामन्यांत १८ गडी बाद केले आहेत.

- Advertisement -

४८ सामन्यांत ८१ विकेट

आयपीएल स्पर्धेत त्याला फारशा विकेट मिळवता आल्या नसल्या तरी त्याने स्थानिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. २०१८ मध्ये प्रसिद्धला भारत ‘अ’ संघात संधी मिळाली. त्यानंतर याच वर्षी त्याला एसीसी इमर्जिंग टीम एशिया कपच्या भारतीय संघात स्थान मिळाले. त्याने आतापर्यंत ४८ स्थानिक एकदिवसीय सामन्यांत ८१ विकेट घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत त्याने ७ सामन्यांत १४ बळी घेतले होते. या कामगिरीमुळेच आता त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -