घरक्रीडाU-19 Women's T20 WC : विजयानंतर भारतीय महिला संघाला ५ कोटींची लॉटरी

U-19 Women’s T20 WC : विजयानंतर भारतीय महिला संघाला ५ कोटींची लॉटरी

Subscribe

अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघावर मोठा विजय मिळवला. भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला असून, या विजयानंतर भारतीय महिला संघाला तब्बल ५ कोटींची लॉटरी लागली आहे.

अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडच्या महिला संघावर मोठा विजय मिळवला. भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला असून, या विजयानंतर भारतीय महिला संघाला तब्बल ५ कोटींची लॉटरी लागली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. (Women U19 WC Indias Womens Team Bcci Secretary Jai Shahs Declare Five Crores First World Cup)

सेनवेस पार्क येथे पार पडलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने इंग्लंडला धोबीपछाड देत अंडर-१९ विश्वचषकाची पहिली आवृत्ती आपल्या नावावर केली. या विजयासाठी जय शाह यांनी भारतीय संघासाठी तब्बल ५ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे.

- Advertisement -

“भारतातील महिला क्रिकेटची प्रगती होत आहे आणि या विश्वचषक विजयाने महिला क्रिकेटचा दर्जा काही अंशांनी उंचावला आहे. संपूर्ण टीम आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षीस रक्कम म्हणून ५ कोटी रुपये जाहीर करताना मला आनंद होत आहे. हे निश्चितच नव्या वाटा निर्माण करणारे वर्ष आहे”, असे जय शाह यांनी ट्वीटमध्ये लिहिले.

पाच कोटींचे बक्षीश जाहीर करत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले अन् संघाला ५ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी२० विश्वचषक जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला.

- Advertisement -

हेही वाचा – U19T20WorldCup : गळ्यात विजयी मेडल अन् ‘काला चष्मा’वर भारतीय महिला खेळाडूंचा भन्नाट डान्स; पाहा व्हिडीओ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -