‘२०२२च्या कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये महिला क्रिकेटर्स खेळणार!

कॉमनवेल्थ गेम्समधील क्रिकेटच्या समावेशामुळे आजचा दिवस ऐतिहासिक ठरल्याचे मनू साहनी यांनी सांगितले.

Bhangra women cricketers
भारताच्या महिला क्रिकेटर्स

बर्मिंगहॅममध्ये २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल कॉमनवेल्थ खेळामध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे महिला क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने या बाबतची घोषणा केली आहे. त्यानुसार बर्मिंगहॅममध्ये २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल कॉमनवेल्थ खेळामध्ये ८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचे सामने २७ जुलै पासून सुरू होणार असून ७ ऑगस्ट पर्यंत हे सामने चालणार आहेत.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले – मनू साहनी

आजच्या ऐतिहासिक दिनाचे महत्व विषद करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ मनू साहनी म्हणाले की, आजचा दिवस हा क्रिकेटसाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले आहे, असे मत मनू साहनी यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी ‘सीजीएफ’चे अध्यक्ष डेम लुईस मार्टिन यांनीही आपले मत मांडले. ते म्हणाले की, ”खूप वर्षांनंतर क्रिकेटचा पुन्हा एकदा कॉमनवेल्थ खेळात समावेश करण्यात आला आहे. कॉमनवेल्थ खेळात आम्ही क्रिकेटचे स्वागत करतो, असे ते म्हणाले.


हेही वाचा – भारताच्या दिव्यांग क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानला लोळवले


२७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार सामने

बर्मिंगहॅममध्ये २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल कॉमनवेल्थ खेळामध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. १९९८च्या कॉमनवेल्थ खेळांनंतर पहिल्यांदाच क्रिकेटचा कॉमनवेल्थ खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. १९९८च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्वालांलपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वनडे सामन्यात सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी जॅक्स कॅलिस, रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचा या स्पर्धांमध्ये सहभाग होता. दरम्यान बर्मिंगहॅममधील राष्ट्रकुल खेळामध्ये महिला क्रिकेटर्सचे हे सामने २७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहेत.