घरक्रीडामहिला हॉकी विश्वचषक २०१८ : भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल

महिला हॉकी विश्वचषक २०१८ : भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Subscribe

महिला हॉकी विश्वचषकाच्या बाद फेरीच्या सामन्यात भारताने इटलीवर ३-० च्या फरकाने विजय मिळवच उपांत्यपूर्व फेरीत गाठली आहे.

लंडनमध्ये सुरू असलेल्या महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात भारताने इटलीवर अप्रतिम विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारताने ३-० च्या फरकाने हा विजय मिळवला असून भारताकडून लारेमिसामी, नेहा आणि वंदना कटारियाकडून एक-एक गोल करण्यात आले.


असा झाला सामना 

सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारतीय खेळाडूनी आक्रमक खेळ दाखवायला सुरूवात केली. अगदी सामन्याच्या सुरूवातीच्या ९ व्या मिनिटाला भारताच्या लारेमिसामीने अप्रतिम गोल करत भारताला १-० ची आघाडी मिळवून दिली. यानंतर दुसऱ्या सत्रात इटलीने उत्तम बचाव दाखवल्यामुळे भारताला एकही गोल करता आला नाही. सामन्याच्या उत्तरार्धात मात्र ४५ व्या मिनीटाला भारताच्या नेहाने गोल करत सामन्यात भारताचा दबदबा कायम राखला. यानंतर थेट चौथ्या सत्रात भारताच्या वंदना कटारियाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

- Advertisement -

उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडचे आव्हान

भारताने स्पर्धेतील आपल्या पहिल्याच विजयाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. यानंतरचा भारताचा सामना २ ऑगस्टला आयर्लंड विरूद्ध असणार आहे. भारताला उपांत्यफेरीत पोहोचण्यासाठी आयर्लंडविरूद्धचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -