घरक्रीडामहिला प्रीमियर लीगला उद्यापासून सुरुवात; २३ दिवसात ५ संघ खेळणार २० सामने

महिला प्रीमियर लीगला उद्यापासून सुरुवात; २३ दिवसात ५ संघ खेळणार २० सामने

Subscribe

मुंबई : महिला प्रीमियर लीगच्या हंगामाला उद्यापासून (४ मार्च) सुरुवात होणार असून २३ दिवस चालणाऱ्या या हंगामात ५ संघांमध्ये २० लीग आणि २ बाद फेरीचे सामने होणार आहेत. महिला प्रीमियर लीगमध्ये पहिलाच सामना मुंबई इंडियन आणि गुजरात जायंट्स यांच्यात संध्याकाळी ७:३० वा. मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच महिला प्रीमियर लीगचे सर्व २२ लीग सामने मुंबईच्या डी. वाय. पाटील आणि ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये होणार आहेत.

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्य सीजनमध्ये ५ संघांचा समावेश असून यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात जायट्स आणि युपी वॉरियर्स या संघांचा समावेश आहे. मुंबई इंडियन संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे, दिल्ली कॅपिटल्सची मेग लॅनिंग, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर स्मृती मंधाना, गुजरात जायट्सची बेथ मूनी आणि युपीची एलिसा हीली यांच्यावर जबाबदारी आहे. या महिला प्रीमियर लीगमध्ये ३ संघ ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या नेतृत्वात खेळणार असून २ संघांचे नेतृत्व भारतीय खेळाडूंकडे आहे.

- Advertisement -

महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 मार्च ते २१ मार्च या कालावधीत आयोजित केला आहे. पुरुषांच्या पहिल्या आयपीएल हंगामाप्रमाणे महिला लीगमध्येही प्रत्येक संघ २-२ सामने खेळणार आहे. याप्रकारे प्रत्येक संघ कमीतकमी ८ सामने खेळणार आहे.

महिला प्रीमियर लीगचे २० सामने खेळून झाल्यानंतर पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यावेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेले दोन्ही संघ २४ मार्चला एलिमिनेटरचा सामना खेळेल. या सामन्यात हरणारा संघ तिसऱ्या स्थानावर राहिल, तर विजयी झालेला संघ २६ मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर अंतिम सामन्यात पोहचलेल्या संघाशी स्पर्धा करेल.

- Advertisement -

महिला प्रीमियर लीगमध्ये १७ दिवसात २० लीग सामने होणार आहेत. तसेच ५, १८, २० आणि २१ मार्चला ४ डबल हेडर सामने म्हणजेच एका दिवशी २ सामने होतील. एक सामना दुपारी ३:३० वा. तर दुसरा सामना संध्याकाळी ७:३० वा. सुरु होतील. हे दिवस सोडले तर सर्व सामने संध्याकाळी ७:३० वा. सुरू होतील. एलिमिनेटर आणि अंतिम सामनासुद्धा संध्याकाळी ७:३० सुरू होईल.

१७ आणि १९ मार्चला विश्रांतीचे दिवस आहे, कारण की या दिवशी पुरुषांच्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटप्रेमींना दोन्ही ठिकाणी वेळ घालवता यावा यासाठी महिला प्रीमियर लीगचे सामने होणार नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -