घरक्रीडाWomen's World Boxing Championships : मेरी कोम सेमी-फायनलमध्ये; विक्रमी सातवे पदक निश्चित

Women’s World Boxing Championships : मेरी कोम सेमी-फायनलमध्ये; विक्रमी सातवे पदक निश्चित

Subscribe

सेमी-फायनलमध्ये धडक मारल्यामुळे मेरी कोमने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील आपले विक्रमी सातवे पदक निश्चित केले आहे.

भारताची आघाडीची बॉक्सर मेरी कोमने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे तिने महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील आपले विक्रमी सातवे पदक निश्चित केले आहे. आपले सातवे पदक निश्चित करत मेरी ही महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॉक्सर बनली आहे.

चीनच्या वू यू वर मात 

महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या ४८ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात मेरी कोमने चीनच्या वू यू वर ५-० अशी मात केली आहे. या विजयामुळे तिने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे तिने आपले पदक निश्चित केले आहे. उपांत्य फेरीत पराभव होणाऱ्या दोन्ही बॉक्सरना कांस्यपदक मिळते. मेरीने याआधी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ५ सुवर्ण आणि १ रौप्य अशा एकूण ६ पदकांची कमाई केली आहे. यावर्षीच्या स्पर्धेत येण्यापूर्वी मेरी आणि आयर्लंडची महान बॉक्सर केटी टेलर या दोघींच्या खात्यात ६-६ पदके होती. पण मेरीने आपले सातवे पदक निश्चित करत ती महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी बॉक्सर बनली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -