घरक्रीडावर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधूला रौप्य पदक

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधूला रौप्य पदक

Subscribe

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पेनच्या करोलिना मरिनने पी व्ही सिंधूचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले आहे.

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पेनच्या करोलिना मरिनने पी व्ही सिंधूचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले आहे. तर पी व्ही सिंधूला सलग दुसऱ्यांदा रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. करोलिना मरिनने अंतिम सामन्यात सिंधूचा २१-१९, २१-१० असा पराभव केला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पी व्ही सिंधूचे हे चौथे पदक आहे. करोलिना मरिन तिसऱ्या वेळी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचली आणि तिसऱ्या वेळी तिने सुवर्ण पदक पटकावले आहे.

४५ मिनिटं सुरु असलेल्या या सामन्यामध्ये मरिनने सिंधूचा २१-१९, २१-१० पराभव केला. या पराभवामुळे सिंधूला पुन्हा एकदा रौप्य पदावरच समाधान मानावे लागले आहे. पी व्ही सिंधूचे हे दुसरे रौप्य पदक आहे. याआधी दोन वेळा म्हणजे २०१३ आणि २०१४ मध्ये पी व्ही सिंधूने कांस्य पदक पटकावले होते. मरिन आणि सिंधूमध्ये या सामन्यापूर्वी १२ सामने झाले होते.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -