घरफिचर्सघंट्याहून मिन्ट भारी!

घंट्याहून मिन्ट भारी!

Subscribe

एज अर्ली एज पोशिबल उर्फ asap, urgent, तात्काळ, राईट हिअर राईट नाव हे समदंच खराय. अर्जन्सी राहतीय, पर बक्कळ बार्‍या ती फाल्सवाली म्हंजी खोटी. मग खोटी ती अर्जन्सी कसली? माहीत असून कसं पळावं हो. पळावं पर कुठं? अन त्येबी असं बसल्याजागूनच?

लोकल आली. दार धरून उडी मारली. जीवाच्या घाईने मधी शिरलो. डावीकडं बघतीलं,उजवीकडं बघतीलं अन मंग रिअलाईझ झालं की ‘हात्तेच्या मारी गाडीत खाली शिटा हायेत!’

… मंग लक्षात आलं का आपला कोपरा लागल्यानंच दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या म्हथार्‍या काकाचं तोंड हिरवं झालंय.अन म्हणूनच त्येनं चिडून आपल्याला ‘दिकता नाही है क्या’ असं मनलाय. त्येला बॉटम ऑफ हार्टपासून सॉरी म्हणू वाटलतं, पर शेम टायमाला खाली दिसलेल्या शीटवर शीट टेकीवनं जास्त महत्त्वाचं वाटलं. म्हणून मी माफीचा इचार उडवीत शीट काबीज करण्याचं काम आद्दीपद्दी केलं. आधी बद्दमन्या बसलो, मंग बसल्याजागुनच उठून जेवणाच्या डब्याची लॅपटॉप बॅग वरच्या स्ट्यांडवर ठिवली. कायाय लोकलमधी लॅपटॉपची वाट लागन म्हणून तो हापिसात टेबलावर ठेऊन येताव तिथं २४/७ कॅमेरा सर्व्हेलन्स हाय.तिथं तो शेफ राहतोय. आता बसल्यावर रोजच्यासारखा इचार आला, कसली अवचिंद मुंबई नगरी हाय बाबा ही, निस्त जंगी भवर्‍यावनी हालत करतीय आपली. आता मी बसल्याजागून बघतीलं म्हथारा आणिबी छाती चोळूलालता. आजून वाईट वाटलं. पण जाऊन माफी मागायचं म्हंजी शीटखाल्ली शीट जाणार. अन आपल्या माफीनं त्येचं दुखणं कमी होणार तर नाहीच असला मुंबई पेशल प्रॅक्टिकल इचार डोक्यात घुसला. म्हणून मंग बसल्या जागीच चूकचुकलो. अन डोक्यात घुसलेला इचार सुरु…

- Advertisement -

मुंबई सगळ्याच्या हार्टची धडधड धडाधड वाढवतीय. इथल्या एवढं व्होल भारतात कुठंच गाड्या सुटत नसतील. तरी बी स्टेशनवर हुबारलेल्या प्रत्येकालाच वाटतंय हीच आखरी हाय. टायमिंग ७:१८, ८:३४, ९:१९ असले आडमधडम, घंट्यापेक्षा इथं मिनिट भारी. मंग उगूचंच घंटा, दिवस,साल असला इचार नं करता मिन्टा मिन्टाचा खेळ सुरु हुन आपला तो शर्यतीत पळणारा बोल्ट होतोय. मुंबई नगरीत मंग आपल्याला नं कळनावनी आपलं फट्टदिशी कंडिशनींग होतंय. आपल्याला जल्दीची ढळांडी लागतीय. जिथं तिथं आपल्याला जल्दी जल्दी पोचावं वाटतंय. अन ती आपली ठार आदतच होतीय. गर्दी असताना जल्दीनं घुसायचंच असतंय पण गर्दी नस्ताना? आदत से मजबूर.

माझा बॉस म्हणीत होता यहां प्रेशर कुकर बनोगे तभी आगे बढोगे त्येनं आगे बढुन माझा बॉस झाल्ता तवा त्येचं खरंच धरावं लागन. पण आत्ता बसल्या बसल्या डोळे बंद केलेल्या मला विचार युलालाय कि “बाबा झालो मी प्रेशर कुकर पर मधी कायाय? नं वरण ना भात निस्तं पाण्याच्या शिट्ट्या मारून काय हाशील”
एज अर्ली एज पोशिबल उर्फ asap, urgent, तात्काळ, राईट हिअर राईट नाव हे समदंच खराय. अर्जन्सी राहतीय, पर बक्कळ बार्‍या ती फाल्सवाली म्हंजी खोटी. मग खोटी ती अर्जन्सी कसली? माहीत असून कसं पळावं हो. पळावं पर कुठं? अन त्येबी असं बसल्याजागूनच?

- Advertisement -

आता धाडदिशी डोसक्यात घुसल्या इचारानं माझी त्या कोपरा मारलेल्या म्हथार्‍यावनी हालत केल्ती. छातीत कसतर हुलालतं. ईचाराच्या गर्दीबरबर लोकलमदी बी गर्दी वाढल्ती. अन सूड घेतल्यावनी गाडीबी शिग्नल मिळना गेला म्हणून थांबलती. फॅन बंद आन मुंबई अंगातून पानी बीलय काढतीय. डोक्यात चोवीस घंटे चलणार्‍या एफ यमवनी सारके इचार. भरीला शंबर बार लोकलमधली फटका गँग से बचकरवाली अनाउन्समेंट. जरा डोळे उघडून खिडकीबाहिर बगावं मनलं तर पुन्हा दुसरा इचार असा की ‘आपण डोळे उघडलं की उभ्या लोकायला शीट द्यावं लागन.’ कायाय डोळ्याला दिसूनसुद्धा माणसासारखं न वागणं अजून जमना आपल्याला.

सगळं अवघड. पुन्हा पुड्डल्ल स्टेशन, पुन्हा लोकायचं उतरणं. आता आपला फ्लॅट याला फकस्त तीन स्टेशन बाकी. खिडकी मिळालेली अन हवा बी. मग खिडकीबाहिर दिसणार्‍या खाडीकडं बघत रिलॅक्सवाले इचार, मज्जानु लाईफ. पाय सताड समोर, डोळा खरंच लागूलालेला. आता आपला फ्लॅट यायला एक स्टेशन फकस्त बाकी. अन आलं, आल्या आल्या पुन्हा हिट मी सारखा मी टुन्नदिशा उठत बाहेर, एक्या हाताने वरच्या स्टँडवर ठीवलेली डब्याची लॅपटॉप बॅग उचलत. स्पीड फुल्ल उतरनासुद्धा कुणा एकाचा चेहरा हिरवा अन त्याच्या तोंडातून शिव्याबरबर पुन्ना
“दिखता नही क्या?”
मी झाल्या इन्सिडेंट मधली माझी गलती समजून त्येयला सॉरी म्हंजी म्हंजीस्तोर गाडी स्टेशनसे बाहर!

 


– प्रसाद कुमठेकर
(लेखक साहित्यिक आहेत)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -