घरक्रीडासिंधूचा ऐतिहासिक विजय, बॅडमिंटनमध्ये ठरली 'विश्वविजेती'

सिंधूचा ऐतिहासिक विजय, बॅडमिंटनमध्ये ठरली ‘विश्वविजेती’

Subscribe

आज झालेल्या BWUF वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत जापानच्या निजोमी ओकुहाराला अंतिम सामन्यात हरवून पी. व्ही सिंधू विश्वविजेती झाली आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधुने आज एक ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आज झालेल्या BWUF वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत जापानच्या निजोमी ओकुहाराला अंतिम सामन्यात हरवून पी. व्ही सिंधू विश्वविजेती झाली आहे. विशेष म्हणजे हा सामना जिंकणारी  सिंधुही पहिली खेळाडू आहे. या पूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला हा किताब पटकावला आहे. सलग दुसऱ्यांदा सिंधू या सामन्याच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. गेल्या सामन्यात तिला ओकुहाराने हरवले होते. पण आता तिला हरवत सिंधूने हा मान देशाला मिळवून देशाच्या शिरपेचात एक सुवर्ण पंख खोवले आहे.

 असा मिळाला विजय 

सिंधूने अंतिम सामन्यातील खेळाची चांगली सुरुवात केली. पहिल्याच खेळात तिने ११-६ असी सरशी घेतली. पण ब्रेकनंतर जपानची खेळाडू ओकुहाराने चांगले खेळत १५-१३ असा स्कोर करत सिंधूला मागे टाकले. त्यानंतर सिंधूने जी कामगिरी केली आणि लीड घेतली. दुसऱ्या खेळातही सिंधूने चांगली सुरुवात केली. २१-१७ असा फायनल स्कोर करत सामना जिंकला. सिंधू सलग दुसऱ्यांदा फायनलला पोहोचली. गेल्यावेळी तिचा विजय काहीच गुणांसाठी हुकला होता. पण यंदा तिने विजश्री ओढूनच आणली.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -