घरटेक-वेकनवीन फोन घेताय? बजेट १५ हजारच आहे? तर हे आहेत तुमच्या बजेटमधील...

नवीन फोन घेताय? बजेट १५ हजारच आहे? तर हे आहेत तुमच्या बजेटमधील 5G स्मार्टफोन

Subscribe

१५ हजारात 5G स्मार्टफोन

स्मार्ट फोन हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. बाजारात अनेक नवीन नवीन स्मार्टफोन्स येत आहेत. मात्र सध्याच्या परिस्थिती काहींना महागातले फोन घेणे परवडणारे नाही. पण नवीन फोन घेण्याची इच्छा सर्वांना असते. तुम्हालाही नवीन फोन घ्यायचा आहे का? पण बजेट १५ हजार रुपये इतकेच आहे. त्याहून अधिक पैसे खर्च करु शकत नाहीत अशा लोकांनी काय करायचे?  त्यांच्यासाठी १५ हजार रुपयांपर्यंचे फोन्स उपलब्ध आहेत. १५ हजारात 5G स्मार्टफोन तुम्ही खरेदी करु शकता. कोणते आहेत ते स्मार्ट फोन्स जाणून घ्या.

Oppo A53s 5G

तुमच्या बजेटमध्ये Oppo A53s 5G हा स्मार्ट फोन खरेदी करु शकता. Oppo A53s 5Gमध्ये ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ११ बेस्ट कलर्सOS ११.१ वर काम करु शकतो. Oppoच्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७००oc प्रोसेसर देण्यात आला आहे. ८GB रॅम १२८ GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पहिला कॅमेरा १३ मेगापिक्सल दुसरा २ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल डीपथ कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये आहे.

- Advertisement -

Oppo A15s

Oppo A15sमध्ये ६.५२ इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रिन रेझोल्युशन ७२० x १६०० पिक्सल आहे. हा फोन अँड्रोइड १०osवर आधारित आहे. बॅकअप बॅटरी ४,२३०mAh देण्यात आली आहे. Oppo A15sमध्ये स्वेअर AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पहिला कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल देण्यात आला आहे. या फोनची किंमत १२ हजार ४९० रुपये आहे.

Realme 8

Realme 8 या 5G स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे रिझोल्युशन १०८० x २४०० इतके आहे. हा फोन अँड्रोइड ११ बेस्ड आहे. फोनमध्ये ८GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Realme 8 ला ट्रिपल रियर कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे. त्याचबरोबर फोनमध्ये २ मेगापिक्सलच्या दोन लेन्स देण्यात आल्या आहेत. तर १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आलाय. या फोनची किंमत १४ हजार ९९९ इतकी आहे.

- Advertisement -

Redmi Note 10

Redmi Note 10 ला ६.४३ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन MIUI 12 बेस्ट आहे. या फोनला क्वालकॉम स्नेपड्रॅगनचा ६७८ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ६ GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा तर १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे.

Samsung Galaxy F12

Samsung Galaxy F12 या फोनला ६.५ इंचाचा HD Infinity डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन अँड्रोइड ११ ऑपरेटिंग सिस्टिम बेस्ट आहे. फोनमध्ये ४GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे फोनला ४८ मेगापिक्सल प्राइमकी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे.


हेही वाचा – WhatsApp: व्हॉटसप युजर्ससाठी आनंदाची बातमी,15 मे नंतर देखील अकाऊंट होणार नाही डिलिट

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -