घरटेक-वेकFacebook वर करा 'ग्रुप पार्टी'

Facebook वर करा ‘ग्रुप पार्टी’

Subscribe

सोशल मीडियाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फेसबुक नेहमीच काही ना काही नवीन प्रयोग करत असतात. याच धर्तीवर फेसबुकने त्यांच्या युजर्ससाठी एक नवं फिचर लाँच केलं आहे. ‘Watch party’ असं या नव्या फिचरचं नाव आहे. खरंतर फेसबुकने हे अागळंवेगळं फिचर गेल्या वर्षीच लाँच केलं होतं पण त्यावेळी काही मर्यादित लोकच हे अॅप वापरु शकत होते. मात्र, आता फेसबुकच्या अधिकृत घोषणेनंतर आता सर्वच युजर्स हे Watch party अॅप वापरु शकणार आहेत. या फिचरचं वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर करुन तुम्ही रिअल टाईममध्ये एकत्र व्हिडिओ पाहू शकणार आहात. Watch party च्या माध्यमातून एकापेक्षा जास्त युजर्स एकत्रितपणे लाइव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतात. फेसबुकने सांगितल्यानुसार, या फिचरद्वारे व्हिडीओ पाहताना युजर्स एकमेकांशी बोलूही शकतात. कमेंट्स किंवा रिअॅक्शनच्या माध्यमातून युजर्स एकमेकांशी संवाद साधू शकतात.

असं वापरा हे फिचर

या भन्नाट फिचरची अधिकृत माहिती फेसबुकने एका ब्लॉगद्वारे दिली आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्सना फेसबुकवर व्हिडिओ पाहताना आंनददायी अनुभव मिळेल असा दावा फेसबुकने केला आहे. तुम्हाला ज्या ग्रुपसोबत एकत्र व्हिडिओ पाहायचा असेल त्या ग्रुपवर क्लिक केलंत की, तुम्हाला अॅड व्हिडिओ नावाचा एक नवा पर्याय दिसेल. हा पर्याय वापरुन तुम्ही तुमच्या ठराविक ग्रुप व्यतिरिक्त अन्य फ्रेंड्ससोबतही व्हिडिओ पाहता येईल. Watch Party अॅप ग्रुपव्यतिरिक्तच्या अन्य फ्रेंड्ससोबत वापरता यावं, यादृष्टीने चाचणी सुरु असल्याचं फेसबुकने सांगितलं आहे. फेसबुकचं हे नवं व्हिडिओ शेअरिंग फिचर, युट्यूबला टक्कर देण्यासाठी बनवण्यात आल्याची चर्चा सध्या रंगते आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -