घरटेक-वेकRoyal Enfield चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच लाँच होणार 'या' चार बुलेट

Royal Enfield चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच लाँच होणार ‘या’ चार बुलेट

Subscribe

Royal Enfield लवकरच त्यांची नवी Royal Enfield Himalayan लाँच करणार असल्याची घोषणा केल्यानंतर Royal Enfield च्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी खूशखबर म्हणजे Royal Enfield एक नाही दोन नाही तर चार बुलेट्स बाजारात लवकरच लाँच करणार आहे. Royal Enfield चे भारतात ज्याप्रमाणे नावलौकिक आहे तसे इतर बाईक्स कंपन्याच्या तुलनेने कमीच. एक लाखापासून ते साधारण दोन अडीज लाखांपर्यंत Royal Enfield च्या जबरदस्त बाईक्स मिळतात. तरूणांपासून ते काही वयोवृद्ध मंडळी देखील बुलेट्सचे चाहते असतात. त्यामुळे बुलेटची क्रेझ सर्वांमध्येच असल्याने बुलेट खरेदी करतात त्या बाईक्सची वाट देखील पाहावी लागते. मात्र आता जर तुम्ही बुलेट्स खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं धीर धरा… कारण लवकरच बाजारात Royal Enfield च्या चार नव्या कोऱ्या बुलेट्स दाखल होणार आहेत.

रॉयल एन्फील्ड हंटर (Royal Enfield Hunter)

Royal Enfield लवकरच रॉयल एन्फील्ड हंटर ही बाईक लाँच करणार असून या क्लासिक ३५० बाईकला ३५० सीसीचं इंजिन असणार आहे. Royal Enfield चाहत्यांमध्ये मोठी वाढ होत असून क्लासिक ३५० बाईकला सर्वाधिक पसंती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच Royal Enfield च्या नव्या लाँच होणाऱ्या बाईकचे रॉयल एन्फील्ड हंटर हे नवा समोर आले आहे. ही बाईक मे २०२१ मध्ये लाँच होणार असून या बाईकची किंमत १.७० लाख असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

रॉयल एन्फील्ड क्लासिक ३५० (Royal Enfield Classic 350)

सर्वाधिक चर्चेत असलेली रॉयल एन्फील्ड क्लासिक ३५० या बाईकचे नवे मॉडेल लवकरच लाँच करण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारलेली ही बाईक आधीच्या मॉडेल पेक्षा अधिक चांगली असल्याचे सांगितले जात आहे. ही बाईक फेब्रुवारी २०२१ मध्ये लाँच होणार असून या बाईकची किंमत १.७० लाख असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टर (Royal Enfield Interceptor 650)

रॉयल एन्फील्ड ही बाईक ६५० सीसी इंजिनची असून ही बाईक ३५० सीसीच्या इंजिनमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बाईकचे नाव रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टर ३५० असे दिले असावे. ही बाईक सिंगल एग्सॉस्ट सिस्टमसह लाँच करण्यात येणार आहे.

रॉयल एन्फील्ड क्रूझर ६५० (Royal Enfield Cruiser 650)

रॉयल एन्फील्ड क्रूझर ही बाईक ६५० सीसी इंजिनची असून ही बाईक रॉयल एन्फील्डच्या Interceptor 650 आणि continental GT 650 च्या पोर्टफोलिओमध्ये दिसणार असल्याचेही सांगितले जात आहे. ही बाईक जुलै २०२१ मध्ये लाँच होणार असून या बाईकची किंमत ३.५० लाख असल्याचे सांगितले जात आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -