घरटेक-वेकयेत्या महिन्यात Google बंद करणार त्यांची खास सेवा, वाचा सविस्तर

येत्या महिन्यात Google बंद करणार त्यांची खास सेवा, वाचा सविस्तर

Subscribe

जगभरात गूगलची सेवा वापरणारे युजर्स सर्वाधिक आहे. याच यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तूम्ही देखील दैनंदिन गूगलचा वापर करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. टेक जायंट गूगल लवकरच त्यांच्या फोटोंच्या गुगल फोटोंसाठी फ्री स्टोरेज बंद करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अ‍ॅपचे जगभरात कोट्यावधी युजर्स आहेत. असे सांगण्यात येत आहे की, येत्या पुढील महिन्यापासून, गूगल आता त्यांच्या यूजर्सना १५ जीबी क्लाऊड स्टोरेज विनामूल्य देणार आहे. ज्यामध्ये सर्व गूगल प्रोडक्टसाठी समान स्टोरेज देण्यात येण्यात येईल. त्यामुळे आता गुगलवर यूजर्सना १५ जीबीपेक्षा अधिक स्पेससाठी गुगलचे गुगल वन खरेदी करावे लागणार आहे. याकरता यूजर्सना १०० जीबी स्टोरेजसाठी १९.९९ डॉलर्स द्यावे लागतील, म्हणजेच साधारण १,४६० रुपये मोजावे लागणार आहेत.

१ जूनपासून बंद होऊ शकते फ्री सेवा!

गूगलची ही विनामूल्य सेवा बंद झाल्यानंतर तुम्ही तुमचे फोटो सुरक्षित ठेऊ इच्छिता तर तुम्हाला तुमचे जुने फोटो डाउनलोड करून ते सेव्ह करावे लागणार आहेत. गुगलच्या मते, १ जून २०२१ पूर्वी अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओ १५ जीबी स्टोरेजमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत. तसेच जीमेल, गुगल डॉक्स, गुगल शीट्स आणि गुगल ड्राईव्ह सारख्या अन्य गुगल अॅप्समध्ये विनामूल्य १५ जीबी फ्री स्पेस समान प्रमाणात विभागण्यात येणार आहे.

- Advertisement -

स्टोरेज संपल्यास गूगल कडून येणार मेल

गूगलच्या यूजर्सचा ज्यावेळी १५ जीबी स्टोरेज स्पेस संपेल तेव्हा गूगल त्यांच्या यूजर्सना यासंदर्भात एक मेल करून त्याची माहिती देणार आहेत. दरम्यान, गूगलकडून यूजर्सना एक संधी दिली जात असून गूगल वरील तुमचे फोटो सेव्ह करा, असेही गूगलने सांगितले आहे

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -