Hyundaiची नवीन कार लवकरच भारताच्या बाजारात

hyundai new car grand i10 nios will launched in the Indian market
Hyundaiची नवीन कार लवकरच भारताच्या बाजारात

२० ऑगस्टला Hyundaiची नवीन कार भारतात लाँच केली जाणार आहे. Hyundaiची नवीन कार Grand i10 च्या उत्पादनला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात असलेल्या Grand i10 पेक्षा नवीन Grand i10 Nios दिसण्यास वेगळी आहे. चेन्नई येथील कारखान्यात Grand i10 या कारच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. चेन्नईतून Grand i10 Nios ही पहिली कार बाहेर पडली आहे. कंपनीच्या डिलर्सकडे किंवा ऑनलाइन पद्धतीने ११ हजार रुपयांमध्ये नोंदणी सुरू केली आहे. कंपनीकडून लाँचिंगआधीच या कारसाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

या कारचं डिझाइन सँट्रोप्रमाणे आहे. कारमध्ये शार्प प्रोजेक्टर हेडलँम्स आणि कॅस्केडिंग ग्रिल आहे. या सर्व फिचरमुळे कारची पुढची बाजू ही दमदार दिसते. ही कार थर्ड जनरेशन आय १० आहे. या कारच्या मागच्या बाजूला बंपर रुंद स्वरुपात आहे. बाजारातील सध्याच्या मॉडलेपेक्षा ही वेगळी आहे.

किंमत

कंपनीकडून या कारसाठी बुकिंग सुरू करण्यात आले असून सध्या कारच्या किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळलेली नाही आहे. पण सध्या बाजारात असलेल्या कारपेक्षा या कारची किंमत जरा जास्त आहे.

इंजिन

या कारमध्ये १.२ लिटर पेट्रोल आणि १.२ लिटर डिझेन राहण्या इतपत इंजिनची क्षमता असण्याची शक्यता आहे. दोन्ही इंजिन हे बीएस-६ मानकांनुसार असू शकतात.

इंटेरियर

या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसह ८-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक एसी, सनरूफ, लिंक कनेक्टिव्हिटी सिस्टिमसह अनेक लेटेस्ट आणि ग्रँड आय १०च्या तुलनेत प्रीमियम फीचर्स आहेत. तसेच डुअरपॅड्सवर डिम्पल्ड टेक्स्चर्ड फिनिशिंग आणि डॅशबोर्ड आहेत.