घरटेक-वेकInfinix कंपनी आणखी एक स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन Zero 8 करणार लाँच

Infinix कंपनी आणखी एक स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन Zero 8 करणार लाँच

Subscribe

Infinix कंपनी बाजारात स्वस्त आमि कमी किंमतीच्या स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. या कंपनीने अनेक स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. ज्याचे दमदार फिचर्स आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात Infinix Smart 4 Plus स्मार्टफोन लाँच केला होता. शिवाय आता समोर आलेल्या लीक्स आणि टीझरनुसार कंपनी एक नवा स्मार्टफोन Infinix Zero 8 भारतात आणत आहे. पण कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. परंतु हा Google Play Consoleवर स्पॉट झाला असून याच्या बऱ्याच फिचर्सचा खुलासा झाला आहे.

MySmartPrice च्या अहवालानुसार, Google Play Console वर Infinix आगामी स्मार्टफोन मॉडेल क्रमांक X687 नावाने लिस्ट झाला आहे आणि हा Infinix ZERO 8 असल्याचे मानले जात आहे. दिलेल्या माहितीनुसार, octa-core MediaTek MT6785 (Helio G90) चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये दमदार ग्राफिक्ससाठी Mali G76 जीपीयू उपलब्ध केले जाईल. शिवाय या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅमची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तसेच 480ppi पिक्सल डेंसिटीसह 1,080×2,460 पिक्सल स्क्रीन रेझोल्यूशन दिले जाऊ शकते. Infinix Zero 8 अँड्रॉइड १० ओएसवर आधारित असेल.

- Advertisement -

या कंपनीशी संबंधी असलेले व्यंकटेश बाबू.जी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर Infinix Zero 8 चा प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच स्पष्ट केले आहे की, ‘कंपनी Infinix Zero 8 सह अजून एक Infinix Zero 8i स्मार्टफोन लाँच करू शकते. Infinix Zero 8 मध्ये ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो डायमंड शेप्ड कँमेरा मॉड्यूलसोबत येईल. फोनमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध होऊ शकतो. तसेच 64MP इमेज सेंसर देखील उपलब्ध होईल.तर यामध्ये युजर्सना अल्ट्रा नाइट मोड आणि 960fps स्लो मोशन रिकॉर्डिंग सारखे फिचर्स मिळू शकतील.’


हेही वाचा – BSNL आता घरोघरी इंटरनेटची सुविधा देणार, लाँच केले BookMyFiber पोर्टल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -