घरटेक-वेकInstagram Users : इन्स्टाग्राम युजर्सने पार केला २ बिलियन युजर्सचा आकडा

Instagram Users : इन्स्टाग्राम युजर्सने पार केला २ बिलियन युजर्सचा आकडा

Subscribe

मेटा अर्थात फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्रामने एका महिन्यात तब्बल दोन अब्ज युजर्सचा आकडा पार केला आहे. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम हे आकडे अधिकृतरित्या जाहीर करुन शकत नाही. कारण लहान मुलं आणि तरुण मुलांच्या मानसिक आरोग्यास पोहचवण्याच्या कथित भूमिकेबद्दल कोर्टात सुनावणी सुनावणी सुरु आहे. CNBC च्या अहवालानुसार, इन्स्टाग्रामच्या कर्मचारीने सांगितले की, फेसबुकने ऑक्टोबरमध्ये त्याचे नाव बदलून मेटा असे केले. मात्र याच्या एक आठवड्याआधी इन्स्टाग्रामने २ अब्ज (बिलियन) युजर्सचा आकडा गाठला आहे.

जून २०१८ मध्ये एका महिन्यात इन्स्टाग्रामने १ अब्ज युजर्सची संख्या पार केली होती. मात्र यानंतर इन्स्टाग्रामने कधी युजर्सची संख्या पुन्हा सार्वजनिक केली नाही. यात इन्स्टाग्रामला दोन अब्जांचा टप्पा गाठण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात, वॉशिंग्टन, डी.सी. येथे यूएस सिनेटच्या सुनावणीत प्रथमच साक्ष देताना, इंस्टाग्रामचे सीईओ अॅडम मोसेरी यांनी इन्स्टाग्रामचा लहान मुलांवर होणाऱ्या प्रभावाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म १३ ते १७ वयोगटातील मुलांसाठी आहे, मात्र हे अगदी स्पष्टपणे डिझाइन केलेले नाही.

अॅप इन्स्टग्राम आपल्या तरुण युजर्सला हानी पोहोचवू शकते. असे कोर्टाने मेटा डेटा लीक प्रकरणावर सुनावणी देताना सांगितले. मात्र यावर मोसेरी म्हणाले की ‘आदराने सांगतो, ‘आमचे अॅप व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारे आहेत असे संशोधन दाखवले जाते यावर माझा विश्वास नाही’ आम्हाला माहीत आहे की, १० ते १० वर्षांची मुले ऑनलाइन आहेत. त्यांना Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर राहायला आवडते. मात्र हे प्लॅटफॉर्म स्पष्टपणे त्यांच्यासाठी बनवले गेले नाही.

- Advertisement -

संशोधकांच्या जागतिक संघाने META ला Facebook, Instagram आणि WhatsApp वरील लहान आणि तरुण युजर्सच्या मानसिक आरोग्याबाबत अधिक पारदर्शक आणि गंभीर होण्याचे आवाहन केले आहे. कारण या प्लॅटफॉर्ममुळे मुलांच्या मेंदूवर होणाऱ्या हानिकारक प्रभाव होत असल्याचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

फेसबुक व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी अमेरिकन काँग्रेससमोर साक्ष दिली की, इन्स्टाग्रामचा तरुण मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यानंतर मेटाने इन्स्ट्राग्राम प्लॅटफॉर्मवर गेल्या आठवड्यात तरुणांसाठी ‘टेक अ ब्रेक’ आणि इतर सुरक्षा वैशिष्ट्ये लाँच केली. सप्टेंबर अखेरीस मोसेरीने जाहीर केले की, Instagram केवळ १३ वर्षांखालील मुलांसाठी तयार केलेले अॅप आहे, Instagram Kids विकसित करण्याच्या आपल्या योजना थांबवल्या आहेत.


बॉलिवूडपासून ते मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ अभिनेत्री ठरल्या कास्टिंग काउच अन् बॉडी शेमिंगच्या शिकार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -