घरटेक-वेकआता Google Maps ची सेवा मराठी भाषेतून...

आता Google Maps ची सेवा मराठी भाषेतून…

Subscribe

भारतातील सर्वाधिक आवडत्या ठिकाणांची नावे आता १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध

एखाद्या अनोळख्या ठिकाणी जायचे असेल मात्र जर ज्या ठिकाणी जायचे असेल तिथला पत्ता माहित नसेल तर कोणताही व्यक्ती सर्रास गुगलमॅप्सचा आधार घेतो. भारतात गुगलमॅप्स वापर करणारे कोट्यावधीच्या घरात आहे. सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे मोठ्या टेक कंपन्यांना भारतीय नेटकऱ्यांच्या गरजा लक्षात घेता त्याच्या गरजांनुसार आवश्यक ते बदल करणं बंधनकारक असतं. याच पार्श्वभूमीवर भारतीय युजर्सच्या गरजा आणि अडचणी लक्षात घेता गुगल मॅप्सने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यापूर्वी फक्त इंग्रजी भाषेचं ज्ञान असणाऱ्यांना किंवा ज्यांना तोडकं-मोडकं इंग्रजी येत त्या युजर्सना हे गुगल मॅप्स वापरणं सोपं होतं. मात्र आता इंग्रजी येत नसेल तरी नो टेन्शन…कारण गुगल मॅप्सची सेवा मराठी भाषेतून उपलब्ध होणार आहे.

गुगल मॅप्सकडून यासंदर्भातील एक घोषणा करण्यात आली असून गुगल मॅप्समध्ये १० भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक भाषेत गुगल मॅप्सची सेवा सुरू झाल्यामुळे इंग्रजी न समजणाऱ्या युजर्सना एखादा पत्ता शोधताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. भारतातील युजर्सची हीच अडचण दूर करण्यासाठी कंपनीने गुगल मॅप्सची सेवा स्थानिक भाषेतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गुगल मॅप वापरणाऱ्या युजर्सच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, एका ब्लॉग पोस्टद्वारे गुगलने १० भारतीय भाषांना सपोर्ट करणारी ऑटोमेटिक ट्रान्सलिट्रेशन सिस्टिम सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. त्यानुसार, गुगल मॅप्सची सेवा आता मराठीसह हिंदी, गुजराती, बंगाली, मल्ल्याळी, कानडी, पंजाबी, उडिया, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. या ब्लॉगमध्ये असेही म्हटले की, या सेवेचा कोट्यवधी वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. इंग्रजी न बोलू शकणाऱ्या युझर्सना आता डॉक्टर, हॉस्पिटल्स, ग्रोसरी स्टोर्स, बस स्टॉप्स, रेल्वे स्टेशन्स आणि अन्य सर्व्हिसेस यांची माहिती मातृभाषेतून घेता येणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -