घरटेक-वेक48 मेगापिक्सल कॅमेरासह Realme X50m 5G लाँच

48 मेगापिक्सल कॅमेरासह Realme X50m 5G लाँच

Subscribe

या फोनची विक्री २९ एप्रिलपासून सुरू होईल.

Realme X50m 5G स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि Realme X50 5G प्रमाणेच स्पेसिफिकेशनसह लाँच करण्यात आला आहे. नव्या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे त्यात 5G सपोर्ट देण्यात आला आहे. याशिवाय यात 120Hz डिस्प्ले, 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 48MP क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या फोनची विक्री लवकरच चीनमध्ये सुरू केली जाईल. भारतात हा फोन कधी लाँच होणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण हा एक मध्यम श्रेणीचा 5G स्मार्टफोन असल्याने तो लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो.

चीनमध्ये Realme X50m ची किंमत २१,५०० रुपये एवढी आहे. ही किंमत बेस वेरियंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजची आहे. त्याचबरोबर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत २५,००० रुपये आहे. चीनमध्ये या फोनची विक्री २९ एप्रिलपासून सुरू होईल. हा फोन निळ्या आणि सफेद रंगांमध्ये उपलब्ध आहे.

- Advertisement -

Realme X50m चे स्पेसिफिकेशन्स

या स्मार्टफोनची डिझाईन Realme 6 प्रमाणेच आहे. यात व्हर्टिकल क्वाड कॅमेरा सेटअप आणि ड्युअल पंच होल कटआउट देण्यात आला आहे. 6.57 इंचाचा FHD+ 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 7nm प्रोसेस आधारित 2.4GHz स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे.

फोटोग्राफीसाठी Realme X50m फोनला क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 48MPचा आहे. याशिवाय 8MP वाइड अँगल कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा देखील देण्यात आला आहे. सेल्फीसाठी दोन 16MP आणि 2MP कॅमेरे देण्यात आले आहेत. याची बॅटरी 4,200mAh असून 30W डार्ट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -