घरटेक-वेकSamsung Galaxyच्या 'या' डिवाईसवर मिळणार विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

Samsung Galaxyच्या ‘या’ डिवाईसवर मिळणार विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

Subscribe

विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लब मेंबरशिप देखिल मिळणार

Samsung ने विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आणली आहे. ‘बॅक टू स्कूल’ या कॅम्पेनमधून काही galaxy Tabsवर स्पेशल ऑफर्स मिळणार आहेत. कंपनीने ही खास ऑफर Galaxy Tab S7+, Galaxy Tab S7, Galaxy Tab S6 Lite आणि Galaxy Tab A7 या डिवाइसला लागू केली आहे. या स्टूडंट एडव्हान्टेज ऑफर्सचा फायदा स्मार्ट कॅफे आणि प्लाजामध्ये घेता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्टोअरमध्ये जाऊन बिलिंगच्या वेळी डिस्काइउंट मिळवण्यासाठी कॉलेज आयडी दाखवावा लागणार आहे. यासोबत विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लब मेंबरशिप देखिल मिळणार आहे. ( Special offer for students on device of Samsung Galaxy)

सॅमसंगने Amazon आणि Flipcartसोबत भागीदारी केली आहे. Amazon प्राइम यंग एडल्ट प्रोग्राम घेतलेल्या विद्यार्थ्यांना Galaxy Tab A7 Wi-Fi आणि Galaxy Tab S6 Lite Wi-Fi वर २ हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो, या ऑफर असलेल्या ग्राहकांना त्यांच्या Amazon अकाउंटवर एक स्पेशल कूपन दिसेल. तर Flipcartवर स्मार्ट अपग्रेड ऑन टॅबलेट्स या प्रोग्रामच्या मदतीने केवळ ७० टक्के पैसे देऊन Galaxy Tablet वापरण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

Samsung ई स्टोअरमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी Galaxy Tab S7+, Galaxy Tab S7,Galaxy Tab S6 Lite आणि Galaxy Tab A7 खरेदी केला असता १० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. देशातील विविध कॉलेजमधील विद्यार्थी ई मेल आयडीच्या माध्यमातून याचा फायदा घेऊ शकतात. त्याचबरोबर Galaxy Tab S7+, Galaxy Tab S7वर किबोर्डवर १० हजार रुपयांचा इस्टंट डिस्काऊंट मिळेल. डिस्काऊंट नंतर Tab S7+ च्या किबोर्डची किंमत ७ हजार ९९९ रुपये आणि Tab S7 ५ हाजार ९९९ रुपयांना मिळेल.


हेही वाचा – twitterने पुन्हा सुरु केलं पब्लिक वेरिफिकेशन, Blue Tick वेरिफिकेशनच्या सोप्या स्टेप्स

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -