अरे वाह! तुम्हीच ठरवा तुमचा डीपी कोण पाहणार, व्हॉट्सअॅपचा नवा फिचर लॉन्च

ऑनलाईन पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर व्हॉट्सअॅपने नवा फिचर आणला आहे. यामुळे तुमचा डीपी कोण बघणार हे तुम्हीच ठरवू शकणार आहात. त्यामुळे या फिचर्सची सध्या खूप जास्त चर्चा रंगली आहे.

जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजिग अॅप सतत अपडेट केले जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार विविध बदल केले जातात. ऑनलाईन पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर व्हॉट्सअॅपने नवा फिचर आणला आहे. यामुळे तुमचा डीपी कोण बघणार हे तुम्हीच ठरवू शकणार आहात. त्यामुळे या फिचर्सची सध्या खूप जास्त चर्चा रंगली आहे. (You decide who will see your DP, launching new feature of WhatsApp)

हेही वाचा – Digilocker on WhatsApp: आता व्हॉट्सअॅपवर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स डाऊनलोड करता येणार

व्हॉट्सअॅप स्टोरीज ज्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या व्यक्तीलाच दाखवू शकता त्याचप्रमाणे आता तुमचा डीपीही संरक्षित करू शकता. ग्राहकांच्या गोपनीयतेचं अधिक संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्या गोपनीयता नियंत्रण सेटिंग्जमध्ये नवीन पर्याय सादर करत आहोत, असं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे.

पूर्वी WhatsApp वापरकर्त्यांकडे तीन पर्याय होते. याता यामध्ये एक नवा पर्याय आला असून कुणी लास्ट सीन, बायो आणि प्रोफाईन फोटो पहायचा हे तुम्ही ठरवू शकता.

कशी कराल सेटिंग?

सुरुवातीला तुमच्या सेंटिग्समध्ये जा.

नंतर अकाऊंट पर्यायावर क्लिक करा.

प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करून प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

तुम्हाला आता समोर चार पर्याय दिसतील.

इथून तुम्ही तुम्हाला पाहिजे तो पर्याय निवडू शकता.

एव्हरीवनवर क्लिक केल्यास तुमचा डिपी सर्वांना दिसेल. ज्यांचा नंबर तुमच्याकडे सेव्ह नसेल त्यांनाही तुमचा डिपी दिसू शकतो.

माय कॉन्टॅक्ट्सवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या सर्व कॉन्टॅक्सना तुमचा डीपी दिसेल.

जर, तुम्ही माय कॉन्टॅक्ट्स एक्सेप्टवर क्लिक केल्यास तुम्हाला ज्या कॉन्टक्टला फोटो दाखवयाचा नाही त्यावर क्लिक करून त्यांच्यापासून तुमचा डीपी लपवू शकता.

चौथा पर्याय असतो नोबडीचा. तिथे क्लिक केल्यास तुमचा डिपी कोणालाच दिसणार नाही.