घरठाणेजिल्हात २५ टक्के आर.टी.ई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

जिल्हात २५ टक्के आर.टी.ई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

Subscribe

२८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

जिल्ह्यात सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता आर.टी.ई 25% ऑन लाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पालकांनी बालकांची अर्ज नोंदणी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या वेबसाईट वर 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत करण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.

बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के ॲानलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६४८ शाळा पात्र असून इयत्ता १ ली साठी ११४६९ व पूर्व प्राथमिक साठी ७९८ जागा उपलब्ध आहेत .
पालकांना ही प्रवेश प्रक्रीया सुलभ होण्याच्या दृष्टीने ऑन लाईनप्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual) , आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

- Advertisement -

हे घटक प्रवेश घेऊ शकतात
या प्रवेश प्रक्रियेत SC/ST/NT/OBC/SBC हे वंचित घटक प्रवेश घेऊ शकतात. तसेच १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या बालकांना आणि ४० टक्के दिव्यांग असणाऱ्या बालकांना आर.टी. ई च्या माध्यमातून प्रवेश घेता येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -