घरठाणेकेंद्र सरकार पुरस्कृत अमृत २.० अभियाना अंतर्गत केडीएमसीच्या ३०३.१२ कोटी रकमेच्या प्रस्तावास...

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २.० अभियाना अंतर्गत केडीएमसीच्या ३०३.१२ कोटी रकमेच्या प्रस्तावास शासनाची मंजुरी

Subscribe

महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे मार्गदर्शनाखाली, केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानाची अंमलबजावणी करणेकामी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ४ कामांचा समावेश अमृत २.० पाणी पुरवठा योजनेमध्ये करण्यात आला असून त्यास केंद्रीय स्तरावर स्विकृती देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेतील नवीन जलकुंभ बांधणे व मजबूतीकरण करणे या कामासाठी केंद्र शासनाने ४८.४५ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली असून यामध्ये टिटवाळा, कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व, डोंबिवली पश्चिम/डोंबिवली पूर्व मिळून १० नवीन जलकुंभ बांधण्याचे नियोजित असून त्यामुळे सदर क्षेत्रात योग्य झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करणे तसेच सखल व उंच भागात योग्य दाब नियंत्रण ठेवून सम प्रमाणात नागरीकांना पाणी देणे सोयीचे होणार असून पाणी गळती वा पाणी वाया जाण्याचे प्रकार टाळता येणार आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नव्याने विकसीत क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा वितरण व्यवस्था विकसीत करणेकामी केंद्र शासनाने २४.४७ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली असून महापालिका क्षेत्रात नव्याने विकसीत झालेल्या परिसरातील नागरीकांना पुरेसा पाणी पुरवठा करणेकरिता सदर ठिकाणी उर्ध्ववाहिनी व वितरण व्यवस्था करण्याचे नियोजित आहे. यामुळे नागरीकांना सम प्रमाणात पुरेसे पाणी देणे शक्य होईल आणि वितरण व्यवस्थेत होणारी गळती व वाया जाणा-या पाण्यावर नियंत्रण होईल.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मोहिली गाव येथे २७५ दशलक्ष लिटर क्षमतेचे उदंचन केंद्र बांधून कार्यांन्‍वित करणेकामी केंद्र शासनाने ७७.५८ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. महापालिकेच्या बारावे जलशुध्दी केंद्रास उल्हास नदीवरील मोहने उदंचन केंद्रामार्फत पाणी पुरवठा केला जातो. हे केंद्र सुमारे ४० ते ४५ वर्षे जुने असून मोहने बंधा-या नजीक असल्याने उल्हास नदीच्या उर्ध्व भागात टाकलेला कचरा मोहने उदंचन केंद्राच्या चॅनेलमध्ये जमा होत असल्याने पंपींग वारंवार बंद होवून पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. तसेच मोहने बंधा-याजवळ वर्षानुवर्षे गाळ साचल्यामुळे पाणी पातळी अपुरी मिळते आणि पुरेशा पाण्याअभावी पंपामध्ये बिघाड होवून दुरुस्तीचा खर्च वाढत राहतो. यासाठी मोहने उदंचन केंद्र उध्व भागात मोहिली गावाजवळ स्थलांतरित करण्याचे नियोजीत आहे. याठिकाणी पाण्याची पातळी खोल असून पाणी स्वच्छ असल्याने नागरीकांना पुरेसा शुध्द पाणी पुरवठा करणे महापालिकेस शक्य होणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील गौरीपाडा येथे ९५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधून कार्यांन्वित करणे याकामासाठी केंद्र शासनाने १५२.६२ लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. महापालिका क्षेत्रातील नागरीकरण झपाट्याने वाढत असून सद्यास्थितीत बारावे, मोहिली व नेतीवली जलशुध्दीकरण केंद्रातून पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होत आहे पण गौरीपाडा, ऊंबर्डे, सापाड इ. परिसर झपाट्याने विकसीत होत असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना अपुरी पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी विकासकांमार्फत खाजगी टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गौरीपाडा कल्याण पश्चिम येथे ९५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधणे नियोजित आहे. जेणेकरुन योग्य व सम प्रमाणात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

या ४ कामांसाठी रु. ३०३.१२ कोटी खर्च अपेक्षित असून सदर कामासाठी येणा-या प्रकल्प खर्चाच्या आर्थिक हिश्याचे प्रमाण केंद्र शासन २५ टक्के, राज्य शासन ४५ टक्के व नागरी स्वराज्य संस्थेचा हिस्सा ३० टक्के इतका आहे.* महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी या ४ प्रकल्पांची निविदा प्रसिध्द करुन काम करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -