Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे दोन गुन्हे नोंदवत ठाणे न्यायालयात दाखल केले ४५० पानी पुरवणी आरोपपत्र

दोन गुन्हे नोंदवत ठाणे न्यायालयात दाखल केले ४५० पानी पुरवणी आरोपपत्र

Subscribe

करमुसे मारहाण प्रकरण

ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने ठाणे शहर पोलिसांना ९० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानंतर शहर पोलिसांनी सखोल चौकशी करून याप्रकरणी ३६४ (अ) आणि १२० (ब) हे आणखी दोन गुन्हे नोंदवत, ४५० पानी पुरवणी आरोपपत्र ठाणे न्यायालयात नुकतेच दाखल केली आहे. यापूर्वी ही याप्रकरणी दोन आरोपपत्र दाखल झालेले आहेत. ठाण्यातील अभियंता करमुसे यांना तत्कालीन गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी एप्रिल २०२० दरम्यान आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करत बेदम मारहाण केली होती.

त्या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल २०२० रोजी भादवि कलम २९२, ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यांनतर याप्रकरणी आव्हाड यांच्यासह १३ जणांना वर्तकनगर पोलिसांनी अटक देखील केली होती. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. या प्रकरणी करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायलयाने ठाणे शहर  पोलिसांना ९० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ४५० पानांची पुरवणी आरोपपत्र दाखल करताना, ३६४ (अ) आणि १२० (ब) हे आणखी दोन गुन्हे नोंदवल्याने आमदार आव्हाड यांच्या अडचणीत आणखीच वाढल्या आहेत.

- Advertisement -

”  याबाबत दुजारो देताना, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने चौकशी करून ठाणे न्यायालयात ४५० पानी पुरवणी आरोपपत्र दाखल केली आहे. त्यामध्ये आणखी दोन गुन्ह्यांची नोंद झालेली  आहे. “- गजानन काब्दुले, सहाय्यक पोलीस आयुक्त, ठाणे शहर.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -