घरठाणेनिलंबित पाडगावकरांसाठी शिवसेनेचा एक गट आयुक्तांच्या भेटीला

निलंबित पाडगावकरांसाठी शिवसेनेचा एक गट आयुक्तांच्या भेटीला

Subscribe

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागामध्ये उपअभियंता रुपेश पाडगावकर यांच्या निलंबनासाठी शिवसेनेची एक लॉबी सक्रिय होती.

ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर विकास विभागामध्ये उपअभियंता रुपेश पाडगावकर यांच्या निलंबनासाठी शिवसेनेची एक लॉबी सक्रिय होती. त्यातच काही दिवसांनी त्या उपअभियंत्याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी दुसरी लॉबी धावून येत त्यांनी सोमवारी ठामपा आयुक्तांची भेट घेतली आहे. यावरून शिवसेनेतील अंर्तगत वाद उफाळून आली आहे. ठाणे महापालिकेच्या महासभेत नाकारण्यात आलेले प्रस्ताव पुन्हा आर्थिक ेतरतुदीसाठी ठेवण्यात आल्याचा आरोप ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

पालिकेचे उपअभियंता पाडगावकर यांच्याकडे बजेट व्यवस्थापनाचीही जबाबदारी सोपवण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून आर्थिक स्थितीप्रमाणे कामाचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार कामांची यादी तयार करून त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. परंतु संबंधित उपअभियंत्यांनी या कामांव्यतिरिक्त इतर कामांना अर्थसंकल्पीय तरतुद केली. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या ठरावाच्या अंमलबजावणीस अडथळा निर्माण झाला होता. तसेच काही कामांसाठी निधी टाकण्यासाठीही त्यांच्यावर शिवसेनेच्या काही वरीष्ठ नगरसेवकांचा दबाव होता. परंतु त्यांनी या नगरसेवकांची मर्जी राखली नसल्याने अखेर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी या उपअभियंत्यावर निलंबनाची कारवाई केली होती.

- Advertisement -

आता अवघ्या तीनच दिवसात या उपअभियंत्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनेतील अन्य एका गटातील काही नगरसेवकांनी सोमवारी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पाडगावकर यांना पुन्हा सेवेत रुजु करण्याची मागणी केली आहे. कारवाई करतांना आधी शहानिशा करणे गरजेचे आहे, त्यांची चुक काय आहे, हे पाहणे महत्वाचे होते. तो चुकीचा आहे किंवा बरोबर हे पाहणे प्रशासनाचे काम आहे. प्रस्तावांवर बजेट टाका किंवा नका टाकू हे आम्ही सांगितले नव्हते. त्यांना माहिती आहे, की निधी कसा कुठे द्यायचा हे पाहणे त्यांचे काम आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे हीच मागणी असल्याचे या दुसऱ्या गटाने भेटीदरम्यान आयुक्तांना सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -